साने गुरुजी विद्यालय आंबेशिव बु. विद्यालयाचा एस. एस.सी.मार्च २०२० चा शंभर टक्के निकाल .

अंबरनाथ (प्रतिनिधी) : अंबरनाथ तालुक्यातील आंबेशिव येथील कै. मोतीराम गणपत दलाल चॅरीटेबल ट्रस्ट संचलित साने गुरुजी विद्यालयाचा  सन २०१९-२० या वर्षीचा एस. एस. सी. (१० वी ) परीक्षेचा निकाल शंभर टक्के  लागला आहे.
       
या घवघवीत यशात शाळेचे संस्थापक अध्यक्ष  श्री. दिलिप (भाई) मोतीराम दलाल शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनिल दळवी सर सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी, शिक्षणमित्र स्वयंसेवक, विदयार्थी,पालक यांचे सर्वांचे अथक प्रयत्न व शाळेने राबविलेल्या वेगवेगळ्या नाविण्यपूर्ण योजना यांचा सिंहांचा वाटा आहे. रोहित गराठे ८५,६० जयदिप भोपी ८५,२०  प्रणाली व्यापारी ८२, शृती भालेराव . व शिवानी भोपी ८० .  हे गुणवंत विद्यार्थी असुन या विद्यार्थ्यांचा गौरव करुन त्याना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत .

संबंधित पोस्ट