बदलापूरात आठ ठिकाणी बसणार ई-टॉयलेट
- by Rameshwar Gawai
- Jul 24, 2020
- 899 views
बदलापूर (प्रतिनिधी) : बदलापुरात सार्वजनिक शौचालयांअभावी नागरिकांची विशेषतः महिला वर्गाची होत असलेली गैरसोय टळणार आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात ८ ठिकाणी ई टॉयलेट बसविण्यात येणार आहेत. याबद्दल मनसेच्या महिला शहराध्यक्ष संगीता चेंदवनकर यांनी नगर परिषद प्रशासनाचे आभार मानले आहेत.
बदलापूर पश्चिम भागात बाजारपेठ, रमेश वाडी रोड, गांधी चौक, उड्डाणपुलाखाली, बदलापूर पूर्व भागात घोरपडे चौकातील गुरुदेव हॉटेलच्या बाजूला, कात्रप तलावाजवळ, वडवली चौक, आदर्श चौक आदी ८ ठिकाणी हे ई टॉयलेट बसविण्यात आले आहेत. त्यांचे ड्रेनेज कनेक्शनचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती संगीता चेंदवनकर यांनी दिली. बदलापूर पूर्व व पश्चिम भागातील बहुतांश नागरिक भाजीपाला व अन्य खरेदीसाठी बदलापूर स्टेशन परिसरात येत असतात. बदलापूर पूर्व भागात स्टेशन ते कात्रप, स्टेशन ते गांधी चौक व पश्चिम भागात स्टेशन ते बेलवली, स्टेशन ते रमेशवाडी या दरम्यान सार्वजनिक शौचालये नसल्यामुळे नागरिकांची विशेषतः महिला वर्गाची प्रचंड गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर मनसेच्या महिला शहराध्यक्ष संगीता चेंदवनकर यांनी गेल्या गेल्या अनेक महिन्यांपासून नगर परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. याबद्दल महिला वर्गाकडून संगीता चेंदवनकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानण्यात आले आहेत.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम