सफाई कर्मचार्यांच्या मोफत अँटीजेन टेस्टसाठी राष्ट्रवादीने दिले ३०० किट
- by Rameshwar Gawai
- Jul 23, 2020
- 865 views
बदलापूर / प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आशिष दामले यांनी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सफाई कामगारांच्या अँटिजेन टेस्टसाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेला मोफत ३०० अँटीजेन किट उपलब्ध करून दिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आशिष दामले यांनी बुधवारी (ता.२२) कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्याकडे हे अँटिजेन टेस्ट किट सुपूर्द केले. बदलापूर शहरात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्या साठी सफाई कामगार महत्वाची भुमिका बजावत आहेत. मात्र त्यांची अद्यापपर्यंत स्वॅब टेस्ट किंवा इतर तपासणी झाली नव्हती. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगर परिषदेच्या सफाई कामगारांच्या अँटीजेन टेस्टसाठी किट उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे आशिष दामले यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बदलापूरातील बेलवली,शनीनगर,रमेशवाडी, कात्रप, शिरगाव आदी भागात सुमारे सहा हजार गरजू कुटुंबांना तांदूळ, तूरडाळ, चणाडाळ, चहा पावडर, साखर आदींचे किट घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले असल्याचे दामले यांनी सांगितले.

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम