माथाडी कामगारांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून QR Code E-Pass द्यावा अन्यथा काम बंद आंदोलन - माथाडी नेते नरेंद्र पाटील

नवीमुंबई (प्रतिनिधी) :  मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नव्यामुंबईतील अन्न-धान्य,कांदा-बटाटा,भाजी व फळे आणि मसाला मार्केट आवारात तसेच इतर बाजार समित्या, रेल्वे माल धक्के व अन्य ठिकाणी व्यवसाय/उद्योगात नागरिकांच्या जिवनावश्यक वस्तूंच्या मालाची चढ-उताराची कामे करणा-या महाराष्ट्र शासनाच्या विविध माथाडी बोर्डातील नोंदीत माथाडी,वारणार, मापाडी व पालावाला महिला कामगार, सुरक्षा देणा-या सुरक्षा कामगार तसेच कार्यालयीन सेवेत काम करणा-या कर्मचा-यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या कोव्हिड-१९ संबधित विमा कवच संरक्षण/सानुग्रह मिळणे, या घटकाला रेल्वेने प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून QR Code E-Pass मिळणे, कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा मिळणे या व अन्य मागण्यांची शासन व संबधिताकडून तातडीने सोडवणूक न झाल्यास तमाम माथाडी कामगारांना कामे केव्हाही बंद करण्याचा निर्णय घेणे भाग पडेल, असा इषारा महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिला आहे.

सुरक्षा रक्षक,माथाडी कामगार व अन्य घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी या घटकाला रेल्वे प्रशासनाकडून QR Code E-Pass मिळण्याची व्यवस्था करावी या मागणीसाठी आज दि.२२ जुलै रोजी माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मध्य रेल्वे हार्बर लाईनवरील वाशी रेल्वे स्थानकासमोर धरणे आंदोलन करण्यात आले, त्यावेळी माथाडी नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी हा इषारा दिला आहे. यावेळी युनियचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील,पोपटराव देशमुख,रविकांत पाटील आदी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी वाशी रेल्वे स्टेशनचे प्रबंधक श्री.ए.एन.सिंग याच्याकडे आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.

      कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संपूर्ण ठिकाणी दि.२२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन जाहीर केला होता, या कालावधीत नव्यामुंबईतील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पाचही बाजार आवारातून नागरिकांना जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी या बाजार पेठा तसेच गॅस सिलेंडर, रेल्वे माल धक्यावर येणारे धान्य,खत व अन्य जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणा-या बाजारपेठा व उद्योग/व्यवसाय शासनाने चालू ठेवले आहेत आणि या बाजारपेठा/उद्योगातील महाराष्ट्र शासनाच्या विविध माथाडी बोर्डात नोंदीत असलेले माथाडी, वारणार,मापाडी,पालावाला महिला कामगार जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची लोडिंग,अनलोडिंगची कामे करीत आहेत, सुरक्षा रक्षक सुरक्षा देण्याची कामे करीत आहेत तर कार्यालयीन सेवेतील कर्मचारी या घटकांच्या संबधित कामे करीत आहेत. माथाडी कामगार व अन्य घटक मध्य व पश्चिम रेल्वे व हार्बर लाईनच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते कर्जत, कसारा,पनवेल पर्यंतच्या परिसरात व पश्चिम रेल्वे लाईनच्या चर्चगेट ते वसई-विरार पर्यंतच्या परिसरात रहात असून, या दरम्यानच्या स्थानकावरून रेल्वे प्रवास करीत असतात. कोरोनाच्या संकटात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा म्हणून जीव मुठीत घेऊन काम करणा-या माथाडी,सुरक्षा रक्षक कामगार व अन्य घटकांना अत्यावश्यक सेवेत समावेश करावा व त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या कोव्हिड-१९ संबधित विमा कवच संरक्षण/सानुग्रह मिळावे, त्यांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी QR Code E-Pass मिळावा, या घटकांचे कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्या या व अन्य मागण्या शासन व संबधितांकडे महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने सादर केल्या आहेत, परंतु याबाबत कोणतीही व्यवस्था केली जात नसल्याने माथाडी कामगारांमध्ये कोरोनाबाबत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे माथाडी कामगार व अन्य घटकांच्या न्याय प्रश्नांची सोडवणूक तातडीने न झाल्यास तमाम माथाडी कामगारांना कामे बंद करण्याचा निर्णय घेणे भाग पडेल, त्यामुळे नागरिकांच्या होणा-या गैरसोईस व इतर परिणामास शासन व संबधित जबाबदार रहातील, असे माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट