वालधुनी नदीचे रुपांतर नाल्यात झाल्याने मनसे करणार आंदोलन . मनसे उपाध्यक्ष राकेश पाटील .
- by Rameshwar Gawai
- Jul 21, 2020
- 322 views
अंबरनाथ (प्रतिनिधी) : अंबरनाथ शहर पूर्वेकड़ील वॉर्ड क्र.५६ मधील पालेगांव जवळ असलेल्या पटेल मार्टच्या बाजुने वाहणाऱ्या वालधुनी नदीचे रूपांतर नाल्यात केल्याबद्दल आणि प्रभागा तील इतर समस्या संदर्भात . १६ जुलै २०२० रोजी मनसे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश मोतीराम पाटिल यानी मनसे च्या वतीने अंबरनाथ नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी धिरज चव्हाण यांच्याशी मांगण्या बाबत चर्चा करुन त्याना लेखी निवेदन होते . परंतु आमच्या मांगण्याचा आता पर्यंत विचार करुन त्या मांगण्या पुर्ण केल्या नाहीत . जर या पावसात पाण्याचे पाणी राहणाऱ्या वस्तीत शिरले तर मनसे स्टाईल ने आंदोलन करन्याचा इशारा राकेश पाटील यानी दिला आहे .
या परिसरात सद्यस्थितीत १५ ते १६ गृहसंकुल असून या ठिकाणी ४५०० ते ५००० लोक वास्तव्यात आहे. तसेच गेल्या वर्षी व या वर्षी पावसाळ्यात पाणी साचुन राहिल्याने या परिसरात निर्माण झालेल्या पावसामुळे पुर सदृश स्थिती निर्माण होते . कारण अंबरनाथ शहर पूर्व वार्ड क्र. ५६ मधील पालेगाव पटेल मार्टच्या समोर असलेल्या वालधुनी नदीचे रूपांतर नाल्यात केल्यामुळे हा परिसरात निर्माण झालेल्या पुरामुळे गेल्या कित्येकदा पुराचे पाणी शिरते . तेव्हा राकेश पाटील यानी बाबत अनेक दा नगरपालिकेच्या ही बाब लक्षात आणु दिली . परंतु हा ग्रामीण भाग असल्या कारणाने या प्रभागात अंबरनाथ नगरपालिका प्रशासन जाणून बुजून दुर्लक्षित करीत असल्याचा आरोप राकेश पाटिल यानी केला आहे.
या परिसरात बिल्डरांकडून नवीन मोठ मोठ्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. पण गेल्या दोन वर्षापासून तेथील रस्त्यावर पावसा मुळे सतत मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर पालेगाव, पटेल मार्ट, विश्वनाथ चौक या ठिकाणी अजूनही व्यवस्थित रस्ते पण तयार झालेले नाहीत. परंतु रस्त्याचे काम पूर्ण झाले नाहीतर गटारे कुठून होतील. तसेच गटारे तयार झाले नाही तर पावसाचे पाणी जाणार कुठून हाच प्रश्न पाटिल याना पडला आहे
दरम्यान पालेगाव या भागात विकासक (बिल्डर) फक्त इमारती, घरे बांधून मोठं मोठी अमिश दाखवून आपली घरे विकत आहे पण मूलभूत एकही सोय सुविधा अद्याप उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यात यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाल्याने संपूर्ण रस्तावर पाणी जमा होऊन ते पाणी इमारतीच्या आत घुसत आहे. त्यामुळे इमारती मधील लिफ्ट, विद्युत मीटर व महत्वाची उपकरणे बंद पडली आहेत. तसेच चार चाकी वाहनांचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचा नाहक खर्च लोकांच्या वार्षिक देखभाल खर्च (मेंटेनेन्स) मधून करावा लागतो. जेव्हा या मध्ये विकासक (बिल्डर) इमारत उभी करत होते. त्याच्या आधी त्यांना माहीत होतं की या ठिकाणी एक मोठी नदी आहे. ती नदी रुंद करून घेतली असती तर भविष्यात मोठ्या प्रमाणात जर पाऊस झाला असता तर पाणी निघून गेले असते. अशी व्यवस्था करायला पाहिजे होती. परंतु विकासक (बिल्डर) याना तर पैसे कमावण्याची घाई आणि नगरपालिकेचे अधिकारी याना पण पैसे घेऊन परवाने देण्याची घाईअसा आरोप ही राकेश पाटील यानी केला आहे . दरम्यान वालधुनी नदीवर अतिक्रमण झाल्याने या नदीचे रुपांतर नाल्यात झाले आहे त्यामुळे सदर परिसरात पाणी शिरते . तेव्हा नगरपालिकेने सर्व समस्या सोडवल्या नाही तर मनसे स्टाईल ने आंदोलन करन्याचा इशारा ही राकेश पाटील यानी दिला आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम