
कोविड सेंटरमधील व्यवस्थेचा आमदारांनी मुख्याधिकाऱ्यांसह घेतला आढावा.
- by Rameshwar Gawai
- Jul 19, 2020
- 1145 views
अंबरनाथ / प्रतिनिधी : अंबरनाथ दंत महाविद्यालयातअंबरनाथ नगर परिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर तसेच कोविड संशयित रुग्णांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मुलांचे वसतिगृहात सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ यांच्यासह पाहणी करून येथील व्यवस्थेचा आढावा घेतला.
सद्यस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विलगीकरण कक्षात ११० कोरोना संशियत रुग्ण उपचार घेत आहेत. आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांशी संवाद साधत उपचारा दरम्यान येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. या पाहणी दरम्यान येथील विलगीकरण कक्षातील रुग्णांकरिता करण्यात आलेल्या ऑक्सिजनची व्यवस्था, पाण्याची व जेवणाची व्यवस्था या आवश्यक बाबींचा आढावा घेतला. तसेच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना दिल्या. कै. बी.जी. छाया उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला. कोरोना संशयित रुग्णांसाठी या रुग्णालयात बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. तसेच ज्या रुग्णांना श्वासोच्छ्वास त्रास होत आहे अशा रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करून घेण्यात यावे व रुग्णालयातील पोस्टमार्टम रूमची दुरुस्ती करण्यासंदर्भातल्या सूचनाही आमदारांनी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना दिल्या आहेत .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम