आठ पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात

बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात जंगी स्वागत.

बदलापूर  (प्रतिनिधी) : बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यातील आठ
पोलीस कर्मचारी कोरोनावर यशस्वी मात करीत पुन्हा कर्तव्यावर हजर झाले.त्यांच्या सहकाऱ्यांनी या कोरोना योद्ध्यांचे पुष्पवृष्टी करून मोठ्या उत्साहात स्वागत केले.

 बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी व सात पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबिय देखील संक्रमित झाले होते. मात्र उपचारानंतर या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. आणि मंगळवारी हे पोलीस कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले. त्यावेळी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्या या कोरोना योद्ध्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.

बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोविड केअर सेंटर असल्याने पोलिसांवर आधीच प्रचंड ताण आहे. त्यात अचानक सात कर्मचारी आणि एक अधिकारी पॉझिटिव्ह झाल्याने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये दडपण होते. मात्र सहकाऱ्यांनी यशस्वी मात केल्यानंतर या पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

संबंधित पोस्ट