अंबरनाथ पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला:सभापतीपदी आनिता निरगुडा, उपसभापतीपदी बाळाराम कांबरी यांची बिनविरोध निवड
- by Rameshwar Gawai
- Jul 05, 2020
- 643 views
अंबरनाथ / प्रतिनिधी : अंबरनाथ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकला आहे. सभापतीपदी अनिता निरगुडा तर उपसभापतीपदी शिवसेनेचे अंबरनाथ तालुका प्रमुख आणि पंचायत समितीचे गटनेते बाळाराम कांबरी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अंबरनाथ पंचायत समितीत आठ सदस्यांपैकी शिवसेनेचे पाच सदस्य आहेत. तर राष्ट्रवादीचे दोन आणि भाजपचा एक सदस्य आहे. अलीकडेच जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार अंबरनाथ पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जमाती महिलासाठी आरक्षित झाले होते. शिवसेनेच्या सदस्य असलेल्या निरगुडा यांना ही संधी मिळाली. तर बाळाराम कांबरी हे उपसभापती झाले आहेत. गेल्या अडीच वर्षात पंचायत समितीच्या कार्यकाळात ग्रामीण भागात पंचायत समितीच्या माध्यमातून विकास कामे झाली आहेत. जिल्हा परिषद आणि राज्यात सत्ता असल्यामुळे या पुढील काळात देखील नागरिकांचा विकासकामांवर भर देणार असल्याचे नवनिर्वाचित पंचायत समिती उपसभापती बाळाराम कांबरी यांनी सांगितले. ग्रामीण भागात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून सिमेंट काँक्रिटचे रस्ते व नळपाणी योजना कार्यान्वित करून पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्ग लावणे हे प्रमुख ध्येय असल्याचेही कांबरी यांनी सांगितले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम