टाकाऊ वस्तू पासुन साकारली विठू माऊलीची मूर्ती
- by Adarsh Maharashtra
- Jul 01, 2020
- 903 views
नवीमुंबई(सुनील गायकवाड) लाँकडाऊन च्या काळात आषाढ एकादशीला पांढरपूला जाऊन विठूरायाचे दर्शन घेता येणार नाही म्हणून घनसोली गावातील नगर सेवक घनश्याम मढवी यांच्या पत्नी सौ. ललिता घनश्याम मढवी यांनी चक्क टाकाऊ वस्तू पासुन विठूरायाची मूर्ती आपल्या घरातच बनवून साकरली आहे.
हि सुंदर मुर्ती बनवताना त्यांनी सँनीनीटायजर खाली बाॅटल वर्तमान पत्र टिशू पेपर पिओपी फेवीकोल या वस्तूंचा वापर करुन त्यांनी विठूमाऊलीची प्रतिमा जशीच्या तशी साकारली आहे.
दरम्यान: घनसोली गावातल नगरसेवक घनश्याम मढवी यांचे कुटूंब हे वारकरी संप्रदायाच्या परंपरेला मनापासुन मानणारं आहेत त्यांचा आदर्श घेऊन तीच परंपरा कायम ठेऊन ते घनसोली विभागात आषाढी एकादशीला भव्य स्वरुपाचा दरवर्षी कार्यक्रम घेत असतात
विठूरायाच्या दर्शनाला जाणा-या भाविकांची कोणतीच अडचण निर्माण होऊ नये म्हणून सतत प्रयत्नशील असतात या वर्षी कोरोनाच्या माहमारी मध्ये व लाँकडाऊनची स्थिती कायम असल्याने कोणताच कार्यक्रम करता येत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपल्याच घरात विठूरायाचे दर्शन आपल्या कुटुंबाला घेता यावे म्हणून सौ. ललिता मढवी यांनी टाकाऊ वस्तू पासुन सुबक व छान अाशी विठूरायाची मुर्ती बनवली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम