
पत्रकार सुरक्षा समितीच्या ठाणे जिल्हा सरचिटणीस पदी प्रदीप रोकडे आणि मंत्रालय संपर्क प्रमुख सचिन बुटाला यांची नियुक्ती.
कोरोना महायोद्धा सन्मानपत्राचे वितरण.
- by Rameshwar Gawai
- Jun 28, 2020
- 1678 views
बदलापूर / प्रतिनिधी : पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा अध्यक्ष अरूण ठोंबरे व पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष यशवंतराव पवार यांच्या मार्गदर्शना खाली ठाणे जिल्ह्यातील निवडक पत्रकाराना कोरोना महायोद्धा पुरस्कारानी सन्मानित केले आहे. पत्रकार रामेश्वर गवई, अजय श्रीवास राव चिरेवील्ला, काशिनाथ भोसले (काका), सौ.भारती सचिन बुटाला, मंगल डोंगरे या पत्रकाराना कोरोना महायोद्धा सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे . तर यावेळी पत्रकार सुरक्षा समितीच्या ठाणे जिल्हा सरचिटणीस पदी प्रदीप रोकडे आणि मंत्रालय संपर्क प्रमुख सचिन बुटाला यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे . निवडक पत्रकाराच्या उपस्थिती मध्ये निलेश पवार, दिनानाथ कदम, अनिल मिश्रा, जाफर वणू, मनोज जैन . सिध्दांत गाडे , संजय साळवे, सचिन बुटाला,आणि कैलास जाधव, आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन उपाध्याक्ष मनोज जैन यानी केले असुन आभार सरचिटणीस प्रदीप रोकडे यांनी मानले आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम