फडणवीस काहीना काही बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत-शरद पवार
- by Reporter
- Jun 27, 2020
- 926 views
सातारा (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार यांनी सत्तास्थापनेसंदर्भातल्या दाव्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. फडणवीस काहीना काही बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी खोचक टीका शरद पवार यांनी यावेळी केली आहे.
सातारा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आले आहेत. यावेळी भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोघांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी शरद पवार यांनी पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावर शेलक्या शद्बांत टीका केली. मला नाही वाटत त्याला काही महत्व द्यावे. लोकसभेला, विधानसभेला ज्या व्यक्तीचे डिपॉझिट जप्त झाले त्या बद्दल काय बोलणार. त्याला लोकांनीच त्या त्या वेळेला बाजुला केले आहे. त्याची नोंद का घ्यावी, सोडून द्या, अशी शेलक्या शब्दांतील टीका शरद पवार यांनी केली.यावेळी त्यांनी चीन भारत सीमेवरील घडामोडींवरून म्हटलं की, संरक्षण मंत्रालयावर आरोप करणं योग्य नाही. राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आता राजकारण नको. भारत-चीन संघर्ष हा गंभीर मुद्दा आहे. मात्र भारत-चीन युध्द होण्यासारखी परिस्थिती नाही. तो रस्ता आपला आहे. चीनने रस्त्यावर अतिक्रमण केलं. तिथं फायरिंग न करण्याचा करार आहे. शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले की, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम सर्व गोष्टींवर होत आहे. लॉकडाऊनमुळे लोक बोलत नाहीत. त्याचा हे फायदा घेत आहे. लोकांच्या सहनशीलतेचा गैरफायदा घेतला जातोय. अर्थव्यवस्था रुळावर आणण्याची आता गरज आहे.
रिपोर्टर