बदलापुर ३० जुन पर्यंत पुर्ण लॉकडाऊन करा . राष्ट्रवादीची मांगणी

बदलापुर / प्रतिनिधी : बदलापुर शहरात कोरोनाची  रुग्ण संख्या साडे पाचशे च्या जवळ पोहचले आहे . तर दिवसे दिवस कोरोना ग्रस्तांचा आकडा वाढत चालल्याने बदलापुर शहर हे एक प्रकारे हॉटस्पॉट बनत चालले  आहे . नागरिक ही लॉकडाऊन शिथिल केल्याने फिजिकल डिस्टंसिंग चा नियम पाळत नाहीत  त्यामुळे कोरोनाचा ससर्ग अधिक वाढन्याची भिती अधिक आहे . म्हणुन शासनाने बदलापुर शहरात ३० जुन पर्यंत कडक लॉकडाऊन करावा अशी मांगणी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव कालिदास देशमुख यानी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर याना एका निवेदना द्वारे केली आहे . 

बदलापुर शहरात लॉकडाऊन शिथिल केल्याने नागरिकानी सर्वच  नियम तोडत बिनधास्त पणे मार्केट मध्ये जाऊन गर्दी करणे सुरु केले आहे . त्यामुळे शहरात कोरोना ग्रस्तांचा आकडा अधिक वाढु  शकतो सध्या तर ५५० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण बदलापुर शहरात आहेत . त्यामुळे पुन्हा हे रुग्ण वाढ नये म्हणुन शासनाने बदलापुर शहरात  ३० जुन पर्यंत लॉकडाऊन कडक करावा अशी मांगणी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव कालिदास देशमुख यानी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर  याना निवेदनाद्वारे केली आहे . 

संबंधित पोस्ट