बदलापूर नगरपरिषदेला पँकेज न दिल्यामुळे बदलापूर शहरांमध्ये राज्य सरकार विरुद्ध मोठी नाराजी.

बदलापुर : महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना विरुद्ध लढण्यासाठी ठाणे महानगरपालिका. उल्हासनगर महानगर पालिका कल्याण महानगरपालिका. अंबरनाथ नगरपरिषद, भिंवडी महानगर पालिका याना कोरोना विरुद्ध लढण्यासाठी करोडो रुपये निधी उपलब्ध करुन दिला असुन बदलापूर नगरपरिषद कोणत्याही प्रकारचे पँकेज न दिल्यामुळे बदलापूर शहरांमध्ये राज्य सरकार विरुद्ध मोठी नाराजी आणि संतापाची लाट पसरली आहे. बदलापूर शहरांमध्ये देखील रोजच्या रोज कोरोना बाधिताची संख्या झपाट्याने वाढत चालली असुन बदलापूर शहरात दिड महीना एक पण कोरोना बाधित नव्हता आज कोरोना ची संख्या ही ४४८  गेली १००  रुग्ण कोविड केयर सेंटर  मध्ये त्याच्या उपचार चालू असुन मृत्यूचा आकडा हा ११  च्या घरात गेला आहे , राज्यामध्ये शिवसेनाची सत्ता असून ठाणे जिल्हा पालकमंत्री देखील शिवसेनेचे आहेत विषेश म्हणजे बदलापूर नगरपालिकेवर देखील शिवसेनेचीच सत्ता असून बदलापुर शहरांमध्ये कोरोना ग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन खुद्द पालकमंत्री यांनी बदलापुर सोनिवली येथे कोरोना हाॅस्पिटलचे  ऊध्दाटन केले  असताना बदलापूर शहराला निधी उपलब्ध नाही ? कोरोना चे ऐवढे मोठे संकट बदलापुरकर वासीयांवर असताना एक दमडीची पण मदत राज्य सरकारने दिली नसल्याने शहरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे ,असेच असेल तर नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता असून उपयोग काय?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे 

कोरोना प्रादुर्भाव मुळे कुळगांव -बदलापूर नगरपरिषदची निवडणूक पुढे ढकलण्यात आली काही महीन्या नंतर  याना याची जागा  दाखवुन देऊ .महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता  असून बदलापूरकरावर अन्याय केला असून आम्हाला या सरकार ने मरणाच्या दारावर नेऊन ठेवले आहे .  आम्ही पण जेव्हा निवडणूक होईल याना याची जागा दाखवून देऊ अशा प्रकारच्या चर्चा शहरांमध्ये सुरू असुन,.राज्य सरकारने विरोधी पक्षाला आयते कोलीत दिले असे म्हटले तर काही चुकीचे ठरणार नाही.

संबंधित पोस्ट