भाजपच्या मागणीला आले यश.अंबरनाथ रेल्वे आरक्षण केंद्र उघडले .

अंबरनाथ / प्रतिनिधी : कोरोना विषाणूमुुुळे
लाॅकडाउन पासुन बंद असलेले अंबरनाथ रेल्वे आरक्षण केेंद्र अनलाॅकच्या पहिल्या टप्प्यात शनिवारी १३ जुनपासुन सकाळी ८ ते २ वाजेपर्यंत प्रवाशांच्या सेवेसाठी पुनःश्च उघडले असुन पहिल्याच दिवशी आपल्या इच्छीस स्थळी जाणा-या सुमारे १५० प्रवाशांनी नव्याने आरक्षण केले तर १३१ प्रवाशांनी आपल्या रद्द झालेल्या रेल्वे टिकिटांचा परतावा घेतला. दरम्यान साधारण २ लाख १५ हजार ५८५  रूपये रेल्वे प्रशासनाला परत करावे लागले.
मध्य रेल्वेच्या कल्याण कर्जत रेल्वे मार्गावरील कल्याण व बदलापुर रेल्वे स्थानकातील प्रवासी आरक्षण केंद्र सुरू झाले आहे. अंबरनाथमध्ये रेल्वे तिकिट आरक्षण केलेल्या प्रवाशांना त्यांचा परतावा देण्याची व्यवस्था अंबरनाथलाच करावी अशी मागणी भारतीय जनात पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष अभिजीत करंजुले-पाटील यांनी केली होती. दरम्यान शनिवार १३ जुनपासुन अंबरनाथ रेल्वे आरक्षण केंद्र उघडण्यात आले असुन सकाळी ८ ते २ वाजेपर्यंत नविन आरक्षण व रद्द आरक्षण तिकीटांचा परतावा केला जाणार आहे. आरक्षण केंद्रात आरपीएफ 
पोलिसांनी सोशल डिस्टन्सिंगचे उत्तम व्यवस्थापन केले आहे. मात्र रविवारी काही तांत्रिक अडचणीमुळे प्रवाशांवर ताटकळत उभा राहण्याची वेळी आली. प्रवाशांना आपल्या इच्छीत स्थळी पोहचण्यासाठी महानगरी, पुष्पक, कुशीनगर, कामायनी, पवन, पटना स्पेशल कोर्णाक, नेत्रावती, उद्यान आदी १५ मेल एक्सप्रेस गाडयांचे आरक्षण सुरू करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट