अंबरनाथ येथिल कोव्हिड १९ रुग्णालया साठी व्हेंटिलेटर द्या . पत्रकार सुरक्षा समितीची मागणी .

अंबरनाथ / प्रतिनिधी : अंबरनाथ मध्ये नव्यानेच ५०० बेड चे कोव्हिड रुग्णालय तयार केले असुन या रुग्णालयात व्हेंटिलेटर ची आवश्यकता आहे . आणि हे व्हेंटिलेटर ठाणे येथिल सिव्हिल हॉस्पिटल मध्ये अरिरिक्त स्वरुपात पडलेले आहेत . त्यामुळे शासनाने काही व्हेंटिलेटर अंबरनाथ च्या कोव्हिड रुग्णालयाला देन्यात यावे अशी मांगणी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे यानी पालक मंत्री एकनाथ शिंदे याना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.

अंबरनाथ शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसे दिवस वाढत चालली आहे . त्यामुळे येथे रुग्णाना उपचार मिळावे म्हणुन एक नवीन ५०० बेड चे कोव्हिड रुग्णालय  तयार केले आहे . परंतु या रुग्णालयात सध्यस्थितीला एक ही व्हेंटिलेटर नाही . दरम्यान या रुग्णालयाला व्हेंटिलेटर ची अत्यंत आवश्यकता आहे . दरम्यान ठाणे येथिल सिव्हिल हॉस्पिटल मध्ये अतिरीक्त व्हेंटिलेटर असल्याची माहीती पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे याना मिळाली तेव्हा त्यानी त्या माहीती च्या आधारावर ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे याना एक निवेदन देवुन अंबरनाथ च्या कोव्हिड रुग्णालयाला  व्हेंटिलेटर देन्याची मांगणी केली आहे .

संबंधित पोस्ट