
बदलापुरात राष्ट्रवादी कॉंग्रस च्या वतीने गरीब आदिवासी याना धान्य वाटप .
- by Rameshwar Gawai
- Jun 11, 2020
- 2142 views
बदलापुर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त काल बदलापूर शहरात ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कडून प्रदेश चिटणीस श्री कालिदास देशमुख यांच्या सहकार्य ने शहरातील आदिवासी भागातील विधवा माता भगिनी याना मोठ्या प्रमाणात धान्य वाटप करन्यात आले आहे .
राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गेल्या ३ महिन्यात शहरातील लॉक डाऊन परिस्थितीत ज्या लोकांनी समाज सेवा , गोरगरिबांच्या मदतीला धावून गेलेले , डॉक्टर, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, अग्निशमक विभाग, पत्रकार, अशा २१ लोकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करन्यात आला आहे .
प्रदेश राष्ट्रवादी च्या सूचनेनुसार या वर्षी रक्तदान शिबिर घेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला आहे . त्याच प्रमाणे बदलापुर
शहरातील तिन्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक यानी कार्यक्रमा ला उपस्थित राहून गोरगरीब याना अन्न दान करन्यास मदत केली . या वेळी श्री कालिदास देशमुख यानी पोलीस कोरोना योद्धा म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिपुत्र साहेब, गणेश देशमुख, ग्रामीण चे पोलीस निरीक्षक संदीप निगडे याना सन्मानित केले आहे . तर
कालीदास देशमुख, हेमंत रुमने, अविनाश देशमुख, अनिसा खान, हेमंत यशवंतराव, दिनेश धुमाळ, सौ धुमाळ ताई, तुषार बलिद,सायली बलिद. विद्या बैसणे, ज्योती वैद्य, उपस्थित होते,
या वेळी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी श्री हेमंत यशवंतराव, सौ सायली बलिद, तुषार बलीद ,दिनेश धुमाळ यानी रक्तदान करुन आपले कर्तव्य पार पाडले
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम