
बदलापुरात कोरोनाचे २६ नवे रुग्ण
- by Rameshwar Gawai
- Jun 11, 2020
- 574 views
बदलापूर / प्रतिनिधी : बदलापुरात गुरुवारी (ता.११) कोरोनाचे २६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये
कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा एक कॉन्ट्रॅक्टर, बदलापुरातील एक पोलीस कर्मचारी, बदलापुर ग्रामीण रुग्णालयाची परिचारिका तसेच दोन बीएमसी कर्मचारी, एक आरपीएफ कर्मचारी, मुंबईतील रुग्णालयाचा सुरक्षा रक्षक व मुंबईतील खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे. १८ जणांना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने लागण झाली असून त्यामध्ये एका ४ वर्षाच्या मुलीचा व २ वर्षच्या मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत बदलापुरात कोरोनाचे ३८० रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ९ जणांचा मृत्यू झाला आहे. १७४ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर १९७जणांवर उपचार सुरू आहेत.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम