
कोरोनावर मात करण्यासाठी अंबरनाथ शहरात'अर्सेनिक अल्बम - ३०' गोळ्यांचे वाटप
- by Rameshwar Gawai
- Jun 10, 2020
- 551 views
अंबरनाथ / प्रतिनिधी : संपुर्ण देशात सद्या कोरोनाने थैमान घातला असून विषाणुचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी शिफारस केल्याप्रमाणे होमिओपॅथिक ' अर्सेनिक अल्बम - ३०' या गोळ्यांचे राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त वाटप अंबरनाथ शहराध्यक्ष सदा (मामा) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे .
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आणि सर्व सामान्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवून कोरोनावर मात करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त अंबरनाथ शहर अध्यक्ष नगरसेवक सदाशिव (मामा )पाटील, राष्ट्रवादी युवकचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक सचिन पाटील यांच्या हस्ते अंबरनाथ शहरातील नागरिकांना होमिओपॅथिक 'अर्सेनिक अल्बम - ३०' या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. व या गोळ्यांचे सेवन कसे करायचे याबाबत माहिती देण्यात आली. व कोरोणाचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार ,प्रसार करण्यात आला आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम