बदलापुरात कोरोनाचे १७ नवे रुग्ण.

बदलापूर / प्रतिनिधी :  बदलापुरात रविवारी  कोरोनाचे १७ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सोमवारीही (ता.८) कोरोनाचे १७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये कॉसमॉस बँक,दादर येथील ५० वर्षीय कर्मचाऱ्याचा समावेश आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने १० जणांना लागण झाली असून त्यामध्ये एका ४ महिन्याच्या मुलीचाही समावेश आहे. तर चार जणांना नायर हॉस्पिटलमध्ये 

उपचार घेत असताना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये ६ व १३ वर्षाच्या मुलींसह ५३ वर्षाच्या पुरुषाचा व ५२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत बदलापुरात कोरोनाचे ३२६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ९ जणांचा मृत्यू झाला आहे. १६१ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर १५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

संबंधित पोस्ट