
बदलापुरात कोरोनाचे १७ नवे रुग्ण
- by Rameshwar Gawai
- Jun 07, 2020
- 495 views
बदलापूर / प्रतिनिधी : बदलापुरात रविवारी(ता.७) कोरोनाचे १७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये ठाणे सिव्हिल हॉस्पिटलचे ६० वर्षीय डॉक्टर, अंबरनाथ येथील ४८ वर्षीय नर्स, आरपीएफ,मुंबईचा ३० वर्षीय कर्मचारी, कल्याण येथील ३७ वर्षीय महिला बस कंडक्टर, ४९ वर्षीय माथाडी कामगार तसेच मुंबईत वेगवेगळ्या खाजगी कंपनीत काम करणाऱ्या दोन इसमांचा समावेश आहे. त्याशिवाय इतर दहा जणांना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये एका ६ वर्षीय मुलाचाही समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत बदलापुरात कोरोनाचे ३०९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ९ जणांचा मृत्यू झाला आहे. १६० जणांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर १४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम