पत्रकार सुरक्षा समितीच्या मागणीला मुख्यमंत्री अनुकूल. पत्रकारांना मिळणार पन्नास लाखाचे विमा संरक्षण.

बदलापूर / प्रतिनिधी : जगाच्या पाठीवर कोरोना महामारी ने धुमाकूळ घातला असताना या बिकट परिस्थितीत पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे महाराष्ट्र राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्यानंतर इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया चे पत्रकार वेगवेगळ्या भागात फिरून कोरोना रोगाबाबत वार्तांकन करून सर्व सामान्य माणसाच्या व देशाच्या भल्यासाठी आपले कुटुंब व संसार बाजूला ठेवून जनजागृती साठी आपली भूमिका अहोरात्र पारपाडत असून अश्या पत्रकारांना कोणताच आर्थिक आधार नसल्याने वर्तमान परिस्थितीत महाराष्ट्र राज्य सरकार ने पत्रकारांसाठी भरीव आर्थिक तरतूद करावी अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने २७ मार्च २०२०  रोजी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली होती . 

महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असून जनतेच्या मनात प्रचंड भीती निर्माण झालेली आहे केंद्र सरकार व राज्य सरकार प्रशासना  च्या माध्यमातून उपाययोजना करत असले तरी पत्रकारांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे राज्यातील पत्रकार स्वतः चा जीव धोक्यात घालून जनतेला सुरक्षित व घरात राहण्याबाबत जनजागृती करत आहेत तसेच राज्य सरकार व जनता यामधील महत्वाचा दुवा म्हूणन भूमिका बजावत आहेत कोरोना हा जीवघेणा रोग माहिती असून देखील आपल्या जीवाची बाजी लावून व कुटूंबाची पर्वा न करता पत्रकार रात्रंदिवस रस्त्यावर फिरून आपले कर्त्यव्य बजावत आहेत. 

केंद्र सरकार व राज्य सरकार ने डॉक्टर पोलीस महसूल प्रशासन वैध्यकिय प्रशासन व जनतेसाठी वेगवेगळ्या भरीव आर्थिक तरतुदी केल्या आहे परंतु जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या पत्रकारांसाठी कोणत्याही आर्थिक तरतुदी केल्या नसल्याने पत्रकार सुरक्षा समितीने राज्य सरकारकडे नाराजी व्यक्त करून पत्रकारांसाठी विमा संरक्षण देण्याची मागणी लावून धरली होती. 

आज राज्यातील पत्रकारांची अवस्था बिकट व सुमार असून अल्प मानधनवर काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या मोठया प्रमाणात असून हे पत्रकार हलाखीचे जीवन जगत आहेत अश्या पत्रकारांना आधार देण्याची गरज असल्याचे मत पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात व्यक्त केले होते 

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेऊन राज्यातील पत्रकारांना कोरोना बाबत पन्नास लाख रुपयांचा विमा संरक्षण जाहीर केलं आहे याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केली आहे. 

राज्यातील पत्रकारांना पन्नास लाखाचे विमा संरक्षण मिळवून दिल्याबद्दल पत्रकार सुरक्षा समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे यानी प्रदेशाध्यक्ष यशवंतराव पवार  यांना  राज्यातील शेकडो पत्रकारांच्या वतीने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित पोस्ट