
अंबरनाथ उपजिल्हा रुग्णालयात कोविड-१९ च्या चाचणी साहित्याची कमतरता.
- by Rameshwar Gawai
- Jun 04, 2020
- 1852 views
अंबरनाथ / प्रतिनिधी :अंबरनाथ शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. ३१ मे पर्यंत रुग्ण संख्या १६६ होती.दरम्यान कोविड -१९ च्या चाचणीसाठी अंबरनाथ येथील उप जिल्हा छाया शासकीय रुग्णालय मोठ्या संख्येने रूग्ण भेट देत असल्याचे वृत्त आहे, परंतु चाचणीकरिता लागणारे साहित्य उपलब्ध नसल्याच्या कारणामुळे रूग्णांना चाचणीसाठी नाकारले गेले आहे. त्यांना तीन-चार दिवसानंतर चाचणीकरिता बोलावले जाते. छाया हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि रुग्णाकरिता निश्चित वेळापत्रकही नसल्यासाची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे .
इंटरनॅशनल ह्युमन राईट्स कॉउन्सिलचे वेस्ट इंडिया झोनल बोर्डचे जनरल सेक्रेटरी स्टालीन नाडर यांनी माहितीची सत्यता पडताळण्याकरिता छाया रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. नितीन राठोड यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सरकारी अनुदानाची कमतरता आहे. जिल्हाधिकारी कार्यालय शासकीय रुग्णालयांना मूलभूत आवश्यकता व वैद्यकीय सहाय्य पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. आम्ही सुद्धा असहाय्य आहोत. हॉस्पिटलमध्ये मेडिकल किट मिळावी यासाठी पर्याय उरला नाही.अशा बिकट अवस्थेत रुग्णाचे हाल बेहाल झाल्याची चर्चा होऊ लागली आहे.
सद्यस्थिती पाहता महाराष्ट्रातील रुग्णाची संख्या गेल्या एका आठवड्यात वेगाने वाढत आहे. या गंभीर समस्याकडे पाहता सरकारी रुग्णालये सर्व बाबींने सुसज्ज असणे आवश्यक आहे. खासगी रुग्णालये कोणालाही जबाबदार नाहीत. त्यामुळे रुग्णांचे सध्या हाल होत आहेत. कोरोना नावाच्या संकटाचा सक्षमपणे निपटारा करण्यात प्रशासनाचे अपयश अशा स्थितीत पोहोचले आहे. जिथे केवळ रुग्णच नाही, तर सरकारी डॉक्टरांनी देखील या परिस्थितीबद्दल सार्वजनिकपणे आपली चिंता व्यक्त केली आहे. लोकांमध्ये भीतीदायक वातावरण आहे .त्यामुळे सक्षतम यंत्रणेसह कोविड -१९ चाचणी करणे महत्त्वपूर्ण आहे. यामुळे एखाद्या संक्रमित व्यक्तीस इतरांना लागण होण्यापासून रोखता येते आणि आवश्यक ती काळजी घेता येते. प्रत्येकाने रोगाचा प्रादुर्भाव रोखणे देखील महत्त्वपूर्ण आहे.
या भयानक समस्याची गंभीर दखल घेत इंटरनॅशनल ह्युमन राईट्स कॉउन्सिलतर्फे सरचिटणीस स्टालिन नाडर, ठाणे जिल्हा सरचिटणीस डॉ. आशिष पावसकर, अंबरनाथ शहर अध्यक्ष विपीन नायर, सहसचिव मुकुंद पांडे, सहसचिव ग्रिप्सन मारटेस व इतर पदाधिकारी यांनी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्यधिकारी श्रीधर पाटणकर यांची भेट घेऊन त्यांना वरील समस्याचे निवेदनपत्र देऊन अंबरनाथमध्ये कोविड -१९ साठी नवीन हॉटस्पॉट बनण्यापूर्वी आधीच्या टप्प्यावर परिस्थितीची चौकशी करण्याची विनंती करण्यात आली आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम