बदलापुरात कोरोनाचे ७ नवे रुग्ण
- by Rameshwar Gawai
- May 31, 2020
- 612 views
बदलापूर / प्रतिनिधी : बदलापुरात कोरोनाचे ७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या २९ वर्षीय कर्मचाऱ्यासह ४५ वर्षीय मुंबई पोलीस, केईएम रुग्णालयाचा २८ वर्षीय सुरक्षा रक्षक,मदिना हॉस्पिटलचा ३१ वर्षीय सफाई कर्मचारी,एसटी महामंडळ कल्याण येथील ५३ वर्षीय कर्मचारी, टीव्ही९ ची ४४ वर्षीय महिला पत्रकार त्याचप्रमाणे एका २६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या २९ वर्षीय कर्मचारी त्याच्या पत्नीला कल्याण येथील रुग्णालयात कोरोनाची लागण झाल्यामुळे बाधित झाला असून गेल्या २५ दिवसांपासून कामावर नाही. दरम्यान, आतापर्यंत बदलापुरात कोरोनाचे २१३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर १०५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून १०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम