वडूज येथील मंडलाधिकारी राजेंद्र जगताप यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
- by Adarsh Maharashtra
- May 30, 2020
- 367 views
सातारा :२९ मे रोजी वडूज येथे नेमणुकीस असलेले मंडलाधिकारी राजेंद्र जगताप यांनी तक्रारदार यांचे मुलाचे नावे बँकेतून शैक्षणिक कर्ज मंजुरीच्या बोज्याची नोंद मिळकतीवर नोंद होणे कामी अर्ज दिला होता. कर्ज बोज्याची नोंद मिळकतीवर चढविण्याकामी जगताप यांनी तक्रारदार यांचेकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती त्यानुसार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी यांनी सापळा रचून जगताप यांना तीन हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले. ऐन कोरोना विषाणूच्या लाॅकडाऊन मध्ये हा प्रकार घडल्याने महसूल विभाग हादरून गेला आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम