बदलापुरात कोरोनाचे १२ नवे रुग्ण आतापर्यंतची रुग्णसंख्या पोहचली २०४ वर

बदलापूर / प्रतिनिधी :  बदलापूरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. बुधवारी १३ रुग्ण आढळून आले असतानाच गुरुवारी १२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बदलापुरात आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या २०४ वर जाऊन पोहचली आहे.  

गुरुवारी (ता. २८) बदलापुरात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपैकी ८ रुग्ण बदलापूर पूर्व भागातील तर ४ पश्चिम भागातील आहेत. रुग्णांमध्ये ३३ वर्षीय मुंबई पोलीस कर्मचारी, उल्हासनगर येथील ४७ वर्षीय पोलीस कर्मचारी, बीएमसीची ४३ वर्षीय महिला सुरक्षा अधिकारी, ३१ वर्षीय बीएमसी कर्मचारी,कूपर हॉस्पिटलची ४१ वर्षीय आया, एचडीएफसी बँक कांजूरमार्ग येथील ४३ वर्षीय कर्मचारी व मुंबई येथे काम करणाऱ्या मार्केटिंग कर्मचाऱ्याचा समावेश आहे. त्याशिवाय  ८,११ व १४ वयोगटातील तीन मुलांसह ६७ वर्षीय सेवानिवृत्त इसम, व एका ८५ वर्षीय महिलेचा समावेश आहे दरम्यान, आतापर्यंत बदलापुरात कोरोनाचे २०४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर ९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर १०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

संबंधित पोस्ट