
माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऑनलाईन काव्य संमेलन.
- by Rameshwar Gawai
- May 28, 2020
- 1538 views
बदलापुर/प्रतिनिधी :कोरोनाचे संकट समोर असताना अनेक कार्यक्रम रद्द केले आहेत. घरात रहा आणि संकटावर मात करा अशी भूमिका असल्याने प्रा.शिरसाठ सर यांनी अनोखी कल्पना सादर करून सगळ्याना एकत्र करून विचारमंथन करण्याचा ध्यास मनाशी बाळगून काल २७/५/२०२० रोजी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिना निमित्त ऑनलाईन काव्य संमेलन प्रा.एस एम सिरसाठ यांनी आयोजित केले होते.
हर्षवर्धन फाऊंडेशन आणि असोसिएशन फॉर सोशिअल इक्विटी यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व कवींना एकत्र करून हे संमेलन आखण्यात आले.यामध्ये सहभागी कवीप्रा.वैभवी आडसुळे, प्रा. सत्यजित कोसंबी प्रा.प्रज्ञाकिरण वाघमारे प्रा उत्तम भगत,प्रा.दीक्षा कदम,प्रा.डॉ अनिल साबळे,पत्रकार मिलिंद जाधव,मा. चरण जाधव (नट,दिग्दर्शक,आणि गायक)प्रा.प्रकाश जंगले,प्रा.विद्यानंद खंडागळे,इत्यादी.कार्यक्रमाचे संपूर्ण व्यवस्थापन प्रशांत भालेराव यांनी केले.मा अरुण ठोंबरे ठाणे जिल्हा अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती यांनी माता रमाई यांच्या कार्यास अभिवादन केले.या अनोख्या संमेलनास सर्वानी मनापासून उपस्थिती लावली याबद्दल सर्वांचे आभार प्रा.एस.एम सिरसाठ आणि अँड.राहुल वाघमारे यांनी मानले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम