धक्कादायक, 80 बाधित अन् 5 मृत्यू सातारा

● कोरोनाच्या लढय़ातील धक्कादायक दिवस

● दिवसभरांत 80 बाधित तर 5 जणांचे मृत्यू 

● जनतेच्या भितीत वाढ

● सातारा, पाटण, खंडाळा भीती वाढत आहे

● रात्रीच्या 28 जणांची अधिकृत माहिती नाही

सातारा,:कोरोनाची भिती आता सर्वांगांत भिनली असतानाच सातारा जिल्हय़ात आता कोरोनाच्या बळींमुळे वेगळी भिती निर्माण होऊ लागली आहे. बुधवारी माणमधील 2, वाई 1, पाटण 1 व खटावमधील एकाचा मृत्यू झाल्याने भितीला तडका बसल्यासारखी परिस्थिती आहे. सकाळी लवकर आलेल्या अहवालात 52 जण पॉझेटिव्ह आहेत पण रात्रीचा अहवाल उशिरापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हय़ात पुन्हा 28 बाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसरांत एकुण 80 जण बाधित तर 5 जणांचा मृत्यू अशी विदारक स्थिती बुधवारची असल्याने हा वार सर्वाधिक धक्कादायक मानला जाणार.  सकाळी आलेल्या अहवालावरून सातारा 9, पाटण 10 व खंडाळय़ात 9 अशी आकडय़ांची खेळी आहे. लोक आता जगाच्या व देशाच्या आकडय़ापेक्षा तालुक्यातल्या आकडय़ाकडे डोळे लावून बसलेत.

कोरोना लढय़ातील सर्वात मोठा दिवस

सातारा जिल्हय़ाचा कोरोना विरोधातील लढा हा 23 मार्च पासून सुरू झाला. त्या दिवसांपासून येणारा प्रत्येक दिवस हा बरा की वाईट हे त्या-त्या दिवसांच्या आकडय़ावरून लोक ठरवत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत आकडय़ांच्या खेळांने गमती केल्या. ज्या दिवशी 1 बाधित सापडला त्याच्या दुसऱया दिवशी सर्वाधिक आकडा होता. त्याच न्यायाने ‘तरुण भारत’ने बुधवारच्या अंकात आकडय़ांसदर्भात हिच भिती व्यक्त केली होती. दुर्दैवाने घडलं ही तसंच.

मंगळवारी रात्री उशिरापर्यंतचा अहवाल प्राप्त नव्हता. बुधवारी तो अहवाल 52 चा आकडा घेऊन आला तर रात्रीच्या अहवालाने 28 दाखवले त्यामुळे एकुणचा आकडा 80 गेलाच शिवाय याच दिवशी 5 मृत्यूही झाले आहेत, हे अजूनच दुर्दैव !

जिल्हय़ात जनजीवन हळूहळू पुर्वपदावर येऊ पहात असतानाच शेकडो ठिकाणी क्वारंटाईन करून ठेवलेल्या लोकांचे धडाधड पॉझेटिव्ह अहवाल येऊ लागले आहेत.

पुण्यापेक्षा मुंबईहून आलेल्या लोकांना जिल्हय़ात विविध ठिकाणी क्वारंटाईन केलेले आहे. त्यांचे व बाधित आलेल्या लोकांचे स्वॅब काढून तपासणीला पाठवण्याच्या कामाने आता युद्ध पातळीवर वेग घेतला असून त्यातील लोकांचे अहवाला पॉझेटिव्ह येऊ लागले आहेत. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत प्राप्त न झालेल्या अहवालाने बुधवारची सकाळ भितीच्या धक्याने सुरू झाली. या अहवालात 52 जणांचे अहवाल पाझेटिव्ह आलेत.

सातारा, पाटण व खंडाळाकडे संख्या वाढत आहे

सकाळच्या अहवालांत माण 5, खटाव 2, जावली 5 महाबळेश्वर 5 कराड 3 व फलटण 1 असे आकडे आले असले तरी सातारा, पाटण व खंडाळय़ातील आकडे ज्या गतीने वाढत आहेत, त्यावरून इथल्या साखळय़ा तोडण्यासाठी लोकांच्या अथक परिश्रमाची गरज आहे. सातारा तालुक्यात 9 (एकुण ), पाटण 10 (एकुण ), खंडाळा 9 (एकुण ), असे आकडे वाढत चालले आहेत.

साखळय़ा तोडण्यासाठी वनवासमाची पॅटर्न राबवा

कोरानासंदर्भात जगभरातून प्रत्येक एका तासांत शंभर अपडेट येत आहेत. मात्र उगाच डोकेफोड करण्यापेक्षा जिल्हय़ातीलच उदाहरणावरून नव्याने कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असलेल्या गावांनी आपली दिनचर्या ठेवण्याची गरज आहे. 

कराड तालुक्यातील वनवासमाची हे छोटेसे गाव यासाठी खुप काही सांगुन जाणारे आहे. छोटय़ाशा गावात बाधितांची संख्या 39 च्या पुढे गेली होती मात्र हेच गाव आता संपुर्ण कोरोनामुक्त म्हणून मोठय़ा ताठ मानेने उभे रहात आहे.

यासाठी ग्रामसमिती असो किंवा शासनाने दिलेल्या आदेशांची तंतोतंत अंमलबजावणी असो या साऱयांकडे त्या-त्या गावांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

         म्हासोलीचा धोका वाढत आहे

कराड तालुक्यातील वनवासमाचीसह मलकापुरही आता कोरोनामुक्तीच्या वाटेवर असताना म्हासोलीचा धोका वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने त्याकडे लक्ष वेधले असले तरी आता हॉटस्पॉट होतील अशा गावांची संख्या ही वाढलेली आहे. अशा वेळी जिल्हास्तरावरील उपाययोजानांपेक्षा त्या त्या ग्रामसमितींनी अचूक उपाययोजनांकडे लक्ष वेधण्याची गरज आहे.

जिल्हय़ात बुधवारपर्यंत

एकुण कोरोनाबाधित   422

एकुण कोरोनामुक्त  126

बळी  13

जिल्हय़ात ऍक्टिव्ह रूग्ण  283

जिल्हय़ासाठीचा बुधवार

एकुण कोरोनाबाधित   80

एकुण कोरोनामुक्त  00

बळी  04

दिवसभरांत आलेले निगेटिव्ह  90









.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट