अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकरीकरिता स्थानिक तरुणांना प्राधान्य द्या-आमदार डॉ. बालाजी किणीकर .

अंबरनाथ  / प्रतिनिधी : सध्या  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन लागू करण्यात आल्याने अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योग धंदे बंद असल्याने कारखानदार व कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासंदर्भात पालकमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी आमाचे अध्यक्ष श्री. उमेश तायडे यांच्यासह कारखानदारांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. लॉकडाउनमुळे परराज्यातील कामगार हे त्यांच्या गावी परतत आहेत. त्यामुळे स्थानिक तरुणांना नोकरीत प्राधान्य द्या असे आवाहन आमदार डॉ. किणीकर यांनी कारखानदारांना केले आहे . 

स्थानिक तरुणांना प्राधान्याने नोकरी मिळावी यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर हे सतत प्रयत्नशील असतात. या बैठकी दरम्यान कारखानदारांच्या समस्या जाणून घेत त्या पूर्णपणे मार्गी लावण्याची ग्वाही ही कारखानदारांनी दिली आहे .तसेच कारखाने सुरू करण्यात यावेत म्हणुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही मदत लागल्यास शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी आहे असा विश्वास ही त्यांनी यावेळी कारखानदारांना दिला आहे . या बैठकीला आमाचे पदाधिकारी श्री.मकरंद पवार, श्री. परेश शहा,श्री.विजयन नायर, श्री.राज पांडे आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट