बदलापुरात कोरोना रोखण्यासाठी बारामती पेंटर्न राबवण्यात यावा -- कालिदास देशमुख .
- by Rameshwar Gawai
- May 25, 2020
- 686 views
बदलापूर / प्रतिनिधी : कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बदलापुरात बारामती पेंटर्न राबवण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेस चे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या कडे केली आहे.
बदलापुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसंदिवस वाढत असून प्रशासन हा प्रादुर्भाव रोखण्यास प्रयत्न करीत आहे परन्तु त्यांच्या प्रयत्नाना यश मिळत नाही हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामतीत ज्या पद्धती ने यशस्वी प्रयोग करण्यात आला त्याच पद्धतीने बदलापुरात एक आरोग्य समिती स्थापन करून त्यात डॉकटर , परिचारिका, स्थानिक नगरसेवक , प्रत्येक पक्षाचे एक सदस्य सफाई कामगार खाजगी लॅब टेक्निशियन आणि आशा सेविकांचा समावेश या समिती मध्ये करून समितीच्या वतीने घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या अहवालानुसार प्रशासना ने ठोस कार्यवाई करावी हा पेंटर्न बदलापुरात यशस्वी होउ शकते असा दावा करताना श्री देशमुख यांनी सांगितले की बदलापुरात दररोज कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे या मुळे बदलापुरकरांच्या आरोग्या ला मोठा धोका निर्माण झाला असून कोरोना ला आटोक्यात आणण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजे चे आहे या पेंटर्न मुळे कोरोना वर अंकुश लावता येईल समितीच्या अहवाला नुसार वेळीच योग्य कारवाई करता येईल ठाणे चे पालकमंत्री यांनी हा पेंटर्न ठाण्यात राबवण्या साठी पुढाकार घेतला असल्याचे समजते बदलापुरात देखील या पेंटर्न वर तातडी ने विचार करण्यात यावा अशी मागणी श्री देशमुख यांनी प्रशासक श्री गिरासे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम