डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा.अलिबागतर्फे कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन.

बदलापुर / प्रतिनिधी : कोरोनाच्या प्रादुर्भावाने केंद्र सरकार व राज्य सरकार नियंत्रण करण्याचा   आटोकाट    प्रयत्न करत आहेत.तरीही देशात रक्ताचा पुरवठा कमी पडत आहे. कोरोनाग्रस्त रूग्णाची संख्या झपाट्याने वाढतच आहे. डॉ. नानासाहेब    धर्माधिकारी      प्रतिष्ठान, रेवदंडा, ता.   अलिबाग तर्फे      अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. याच     अनुषंगाने   कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर शनिवार दि.२३  मे आणि रविवार.   दि.२४  मे २०२०  रोजी आदर्श     मराठी     शाळा, कुळगाव बदलापूर   नगरपरिषद   जवळ, सकाळी ९  ते दुपारी २  पर्यंत शासनाने दिलेले सगळे.  नियम   पाळून आयोजित केले होते .    उल्हासनगर.     मध्यवर्ती रूग्णालय यांच्या    सहाय्याने  शिस्तबद्ध पद्धतीने रक्तदान    करणाऱ्या  व्यक्तीची संपूर्ण  तपासणी  करून   रक्तदान केले . अशाच  प्रकारचे     रक्तदान   शिबिर हे महाराष्ट्रात   अनेक.    प्रमुख    शहरात आयोजित केले आहे. बदलापूरसह ठाणे, रायगड, नाशिक, पुणे, सांगली सारखी शहरात हे  शिबिर राबवले जात असून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

संबंधित पोस्ट