कोरोना च्या संकट समयी आशा सेविकांचे मानधन साठीं काम बंद आंदोलन सुरू .
- by Rameshwar Gawai
- May 23, 2020
- 1122 views
अंबरनाथ/ प्रतिनिधी : कोरोनाच्या या संकट काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रत्यक्षात घरोघरी जाऊन कोविड १९ च्या रुग्णांचा सर्व्हे करणाऱ्या आशा सेविकांचे योगदान मोलाचे आणि महत्वाचे असून मात्र याच आशा सेविकांना सरकार कडून फक्त तीस रुपये देऊन त्यांची घोर थट्टा केली जात असल्याचे उघड झाले आहे शासनाकडून मिळणाऱ्या तुटुपुंज्या अशा वेतना अभावी या सेविकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे त्यांनी राज्य सरकार कडे मागणी केली आहे की आशा सेविकांना पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे .
अंबरनाथ मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून या काळात आशा सेविकांना घरोघरी जाऊन शहरातील नागरिकांना कोरोना सदृष्य लक्षण आहे ,किंवा नाही असे रुग्ण आढळलेल्या परिसरात तपासणीसाठी वा नागरिकां मध्ये जनजागृती साठी या आशा सेविका दररोज जात आहेत. सतत १२ तास या जोखमीच्या कामाच्या मोबदल्यात फक्त तीस रुपये रोज इतका नगण्य मोबदला देण्यात येत आहे. या आशा सेविकाना महिन्याकाठी किमान हजार रुपये देखील मोबदला मिळत नाही शिवाय हे हजार रुपये चे मानधन देखील काही महिन्यां पासून मिळाले नसल्याची माहिती आशा सोनवणे यांनी सांगितली आहे .
अंबरनाथ मध्ये ४९ पैकी ४६ आशा सेविका सध्या कार्यरत आहेत ५० आशा सेविकांची भरती करण्यात आली असून त्यांना सध्या प्रशिक्षण देण्यात येत आहे दरम्यान अंबरनाथमधील आशा सेविकांनी थकीत मानधन मिळावे आणि मानधन वाढवून मिळावे ही मागणी करत मागील आठ दिवसांपासून काम बंद आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आशा सेविकांचा खूप चांगला उपयोग होतो. आरोग्य विषयक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आशा सेविका ओळखल्या जात असून समाजात आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करण्याचे काम आशा सेविकांमार्फ़त केले जाते. सध्या शहरात सर्व वाहतूक बंद असल्या मुळे या सर्व सेविकांना सर्व्हेच्या ठिकाणी पायपीट करत जावे लागत आहे. त्याच बरोबर सर्व्हेच्या वेळी शहरातील नागरिक सुद्धा हवे तेवढे सहकार्य करत नसल्याची व्यथा या सेविकांनी मांडली आहे.
अंबरनाथमध्ये कार्यरत असणाऱ्या या सर्व आशा सेविकांनी महिन्याकाठी किमान पाच हजार रुपये मानधन मिळावे या साठी आशा सेविकानी अश्विनी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ नगरपालिके चे तत्कालीन मुख्याधिकारी देविदास पवार यांची भेट घेऊन मागणी केली होती त्या वेळी श्री पवार यांनी या बाबतीत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते परन्तु श्री पवार यांची बदली झाल्या नंतर हा प्रश्न पुन्हा टांगणीला आहे तसेच या आशा सेविकांनी तालुका पंचायत वैधकीय अधिकारी यांना निवेदन दिले असून परन्तु वैधकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची कोणती ही दखल घेतली नसल्याचे समजते या सर्व आशा सेविकानी काम बंद आंदोलन सुरू केल्याने हास्पिटल प्रशासनाला रुग्णा बाबत योग्य माहिती मिळणे अवगड झाले असल्याचे समजते या बाबत तालुका पंचायत आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही आश्चर्य म्हणजे त्यांच्या विभागाला आशा सेविकांचे काम बंद आंदोलन सुरू आहे याची देखील माहिती नाही
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम