पॅराथायरॉईड ग्रस्त नऊ महिन्यांच्या चिमुरड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया!

नवीमुंबई ( जीवन तांबे )नवी मुंबई येथील आपोलो रुग्णालयातील स्पेशालिस्ट सर्जन्सच्या टीमने दुर्मिळ जन्मजात आजार असलेल्या नऊ महिन्यांच्या लहानग्या बाळावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे.  या बाळाला जन्मापासून सुस्तपणा, चिडचिडेपणा आणि कोणत्याही क्रियेमध्ये उत्तेजन न देणे असे त्रास होत होते, अधिक तपासणीनंतर त्याला लहान बाळांना होणारा गंभीर हाइपोपॅराथायरॉईडीझम हा पॅराथायरॉईड ग्रंथीचा एक दुर्मिळ आनुवंशिक आजार असल्याचे निष्पन्न झाले.  या आजारामुळे शरीरातील कॅल्शियमच्या पातळीचे नियमन केले जात नाही. ऑन्कोलॉजी विभागाचे संचालक, थायरॉईड आणि पॅराथायरॉईडचे व डोके व मानेच्या कर्करोग शस्त्रक्रियांचे विशेषज्ञ डॉ. अनिल के डिक्रुझ आणि त्यांच्या टीमने बाळावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली.  ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि आता बाळ स्थिरपणे प्रगती करत आहे, त्याचा चिडचिडेपणा कमी झाला आहे आणि ते पूर्वीपेक्षा जास्त उत्साही व सक्रिय बनले आहे. लहान बाळांना होणारा गंभीर हाइपोपॅराथायरॉईडीझम हा अतिशय दुर्मिळ आणि संभवतः प्राणघातक देखील ठरू शकेल असा आजार आहे.  संपूर्ण जगभरात याच्या अगदी हातावर मोजण्याजोग्या केसेस आहेत. शस्त्रक्रियेमुळे चांगले परिणाम होतील अशी शक्यता असताना देखील हा आजार दुर्मिळ असल्यामुळे निदान करणे आव्हानात्मक होते.  बाळाचे शरीर शस्त्रक्रियेसाठी तयार व्हावे यासाठी आम्हाला वैद्यकीय उपचार करून त्याच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी खाली आणणे गरजेचे होते. लहान बाळांमध्ये पॅराथायरॉईड ग्रंथींचा आकार अतिशय लहान असतो, रंग अर्धपारदर्शक असतो, स्थिती अतिशय गंभीर आणि सतत बदलत राहणारी असते त्यामुळे त्या ग्रंथी नेमक्या कुठे आहेत ते शोधून काढणे कठीण असते.  तरीही आम्हाला असामान्य ग्रंथी काढून टाकता आल्या आणि दीर्घकाळ टिकून राहतील असे परिणाम मिळावेत यासाठी पॅराथायरॉईड ग्रंथींचे थोड्या प्रमाणात ऑटो ट्रान्सप्लांटेशन करण्यासाठी विशेष तंत्राचा उपयोग करण्यात आम्ही यशस्वी झालो.  यामुळे आता हे बाळ जसजसे मोठे होत जाईल तसतसे त्याची कॅल्शियम रिप्लेसमेंटवर अवलंबून राहण्याची गरज कमी होत जाईल. असे अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे ऑन्कोलॉजी विभागाचे संचालक डॉ.अनिल के डिक्रुझ यांनी सांगितले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट