राष्ट्रवादी काँग्रेसच्या लढ्याला यश, ३८ शोरूम मधील कामगारांना मिळाले थकीत वेतन.

बदलापुर  / प्रतिनिधी : गेल्या आठ  ते पंधरा दिवसा पासून राष्ट्रवादी च्या माध्यमातून ठाणे ग्रामीण चे जिल्हा उपाध्यक्ष श्री अविनाश देशमुख हे मुंबई आणि ठाणे परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तू मधील अग्रगण्य नाव असलेले डिजी १  शो रूम व्यवस्थापना  सोबत बातचित करुन कामगारांना वेतन मिळवून देण्याची  मागणी उचलून धरली होती,काल ह्या मागणीला यश आले आहे .  डिजी१  व्यवस्थापना  सोबत बोलणी करून एक सोईस्करपणे मार्ग काढुन  फक्त बदलापूर च नव्हे तर मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यात असलेल्या सर्व ३८  शो रूम मधील कामगारांचे वेतन देण्यात आले आहे , ही मागणी मान्य करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव  श्री कालिदास देशमुख ह्यांनी मोठी जबाबदारी पार पाडून उद्योग मंत्री ह्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री डॉ ईश्वर कर  ह्यांच्या सोबत बोलणी करून कामगारांना  आपला हक्क मिळवून देण्यास मदत केली आहे .  जवळपास तीन  हजार कर्मचारी ह्यांना ७० %वेतन  मिळाले आहे  ,त्याबद्दल कर्मचारी ह्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे आभार मानले आहे .

संबंधित पोस्ट