बदलापुरात कोरोनाचे १३ नवे रुग्ण

बदलापूर / प्रतिनिधी : बदलापुरात कोरोनाचे १३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी बदलापूर पूर्व भागात ९ तर पश्चिम भागात ४ रुग्ण आढळून आले आहेत. 

बदलापूर पूर्व भागातील रुग्णांमध्ये ३३ वर्षीय शिक्षिका, ५१ वर्षीय शिक्षक, सायन हॉस्पिटलचा २९ वर्षीय सुरक्षा रक्षक, ४२ वर्षीय बँक कर्मचारी,५१ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यासह १८ व २० वयोगटातील दोन तरूणी व एका ६० वर्षीय इसमाचा समावेश आहे. पूर्व भागातील चार रुग्ण एकाच इमारतीत रहाणारे आहेत. बदलापूर पश्चिम भागात ३३ वर्षीय बीएमसी मुकादम, जेजे हॉस्पिटलची महिला कर्मचारी व अंबरनाथच्या ४२ वर्षीय डॉक्टरांसह एका २५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. 

 आतापर्यंत बदलापुरात कोरोनाचे ९८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. ३१ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर ६५ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, शुक्रवारीही (ता.१५) बदलापुरात कोरोनाचे ९ रुग्ण आढळून आले होते.

संबंधित पोस्ट