शिक्षक झाला प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कोरोना टेस्टसाठी स्वॅब सॅम्पल घेण्याची स्वीकारली जबाबदारी

बदलापूर / प्रतिनिधी : कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स, रुग्णालय कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण होत असल्याची अनेक उदाहरणे गेल्या काही दिवसात समोर आली आहेत. असे असताना बदलापुरातील एक शिक्ष क   प्र यो गशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करीत असून त्यांनी कोरोना टेस्टसाठी स्वॅब सॅम्पल घेण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. 

 बदलापुरात राहणारे व अंबरनाथच्या शास्त्री हिंदी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले संतोष दुबे हे कुळगाव बदलापूर नगर परिषदेमार्फत सुरू करण्यात आलेल्या अलगीकरण कक्षात स्वॅब सॅम्पल घेण्याचे काम करीत आहेत. मार्च महिन्यात लॉक डाऊन जाहीर करण्यात आला. कोरोना विषाणूच्या युद्धात डॉक्टर परिचारिका पोलीस असे अनेक  कोरोना वॉरियर्स सहभागी झाले. त्यामुळे शाळेत ज्ञानर्जनाचे काम करत असताना आपल्या देशाप्रती समाजाप्रती आदर भाव व्यक्त करताना आपणही या कार्यात भाग घ्यावा या उद्देशाने संतोष दुबे हेही या युद्धात हिरारीने सहभागी झाले. त्यांचे बीएससी डी एम एल टी पर्यंतचे शिक्षण त्यांना याकामी कामी आले. आणि त्यांनी कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब सॅम्पल घेण्याचे जोखमीचे काम मोठ्या जबाबदारीने स्वीकारले. कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीमध्ये आतापर्यंत ६९ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यासोबतच नगर परिषदेमार्फत आतापर्यंत २०० पेक्षा जास्त रुग्णांचे स्वॅब सॅम्पल घेण्यात आलेले आहेत. त्यापैकी १५६ जणांचे स्वॅब सॅम्पल निगेटिव्ह आलेले आहेत तर २१ जणांचे स्वॅब सॅम्पल रिपोर्ट सध्या प्रतीक्षेत आहेत. 

स्वॅब  सॅम्पल कलेक्ट करणे हे काम मोठ्या जोखमीचे असल्याने त्यांना आपल्या कुटुंबापासून वेगळे राहावे लागते. त्यांना बारा वर्षाचा मुलगा आणि दोन वर्षाची मुलगी आहे परंतु आपण करत असलेले काम जोखमीचे असल्याने ते त्यांच्यापासून वेगळे राहावे लागते. परंतु समाजाप्रती आपले ऋणानुबंध जोपासना करता त्यांनी हा  विरह ही मोठ्या आनंदाने स्वीकारला आहे.त्यामुळे आपल्या कृतीतून समाजासमोर नवा आदर्श ठेवणाऱ्या संतोष दुबे यांचे शहरात कौतुक होत आहे.

संबंधित पोस्ट