केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 20लाख कोटींचे खर्चाचे अर्थसहाय्य मंजुरीचे आश्वासन देण्या अगोदर नागरिकांच्या सूचनांचा देखील विचार करावा.
- by Adarsh Maharashtra
- May 14, 2020
- 525 views
सातारा :(निवृत्ती रोकडे) संसदेत लोकसभा सदस्य संख्या 545.राज्यसभा सदस्य संख्या 245 व संपूर्ण राज्यातील विधानसभा/परिषद आमदार यांची संख्या 4120 असून या सर्व लोकप्रतिनिधी यांचेकडून प्रत्येकी पांच लाख रुपय मदत निधी म्हणून जमा केल्यास जवळपास दोन अरब पंचेचाळीस कोटी, पन्नास लाख रुपये जमा होतील2,45, 500000). यामध्ये माजी खासदार, आमदार संख्या समाविष्ठ नाही. वरील प्रमाणे निधी उपलब्ध झाल्यास निश्चितच भारतीय अर्थव्यवस्था सुदृढ होण्यास मदत होईल. कोरोना संकटात सामान्य जनता , कारखानदार, सरकारी अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांच्या आवाक्यानुसार आर्थिक, सामाजिक योगदान दिले असून आतापर्यंत निवडुकीत लाखो रुपयांचा चुराडा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी जनतेसाठी स्वतः पुढे येऊन त्यांचे नागरिकांप्रती उत्तरदायित्व सिद्ध करावे अशी भारतीय मतदार नागरिकांची माफक अपेक्षा आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम