
अंबरनाथमध्ये कोरोनाचे दोन नवे रुग्ण .
- by Rameshwar Gawai
- May 12, 2020
- 520 views
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये सोमवारी (ता.११) कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये एका ३२ वर्षीय महिलेचा व ३२ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या महिलेला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर पोलीस कर्मचाऱ्याला कोल्हे पोलीस रुग्णालय सांताक्रूझ येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अंबरनाथमध्ये आतापर्यंत कोरोनाचे १६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. ९ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर ६ रुग्णांवर पुढील उपचार सुरू आहेत.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम