
बदलापुरात कोरोनाचे दोन नवे रुग्ण
- by Rameshwar Gawai
- May 12, 2020
- 488 views
बदलापूर : बदलापुरात सोमवारी(ता.११) कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. कात्रप भागातील हे दोन्ही रुग्ण असून त्यामध्ये एका २५ वर्षीय तरुणाचा व एका ५७ वर्षीय इसमाचा समावेश आहे. या दोघांनाही उपचारार्थ ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रात कोरोनाचे ५६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. वीस जणांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर ३५ जणांवर पुढील उपचार सुरु आहेत.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम