अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी बदलले.

कुळगाव बदलापूर नगरपालिका मुख्याधिकारी पदी दीपक पुजारी यांची नियुक्ती. तर अंबरनाथ नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी श्रीधर पाटणकर यांची नेमणूक.

बदलापूर / प्रतिनिधी :  कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणासाठीच्या कामकाजाचे गांभीर्य व  निकड विचारात घेऊन दोन ही नगर पालिकेतील मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या करन्यात आल्या आहेत . त्यांच्या बदली चे आदेश देखिल   निर्गमित करण्यात आले आहेत.हे  दोघेही मुख्याधिकारी कोरोना आजाराच्या काळात चांगलेच चर्चेत राहिले आहेत . अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार हे येथिल एका राष्ट्रवादी नेत्याच्या फर्म हाऊस वर परिवारा सह मौज मजा करायले गेले होते . तेव्हा हे प्रकरण चांगलेच गाजले होते .दरम्यान शासनाने  बुलढाणा जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पुजारी यांची कुळगाव बदलापूर नगरपालिका मुख्याधिकारी पदी नियुक्ती केली आहे  .

दीपक पुजारी यांची प्रशासकीय कारणास्तव प्रकाश बोरसे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर बदली करण्यात आलेली आहे. दीपक पुजारी यांनी यापूर्वी मीरा-भाईंदर महापालिकेत उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे.  तर अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांची उचलबांगडी करुन त्यांच्या  जागी जुने जाणते अधिकारी  श्रीधर पाटणकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट