खाजगी वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर प्रवासाला परवानगी मिळावी यासाठी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचे नगरविकास मंत्र्याना निवेदन.

अंबरनाथ / प्रतिनिधी : शहरातील वाढती गर्दी व शासकीय यंत्रणेला कुठेतरी सवलत मिळावी. कामाचा इतका ताण असताना कोणतेही काम सोपे व्हावे या उद्देशाने माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी गेल्या दिड महिन्याच्या लॉकडाऊन मुळे अनेक मजूर, नागरिक, विद्यार्थी आपल्या राज्यात अडकून पडले आहेत, त्यांना आपापल्या राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी सशर्त परवानगी मिळाली असली तरी या सर्व प्रक्रियेत त्यांची हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे, त्याच बरोबर ही प्रक्रिया बरीच किचकट स्वरूपाची असल्याने पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय प्रशासन यावर याचा ताण पडत आहे. परिणामी नागरिकांचे घोळके बाहेर दिसत आहेत त्यामुळे सोशल डिस्टंसिंग  चा नियम पायदळी तुडवले जात आहेत.

वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर सवलत-

आपल्या राज्यातून परराज्यात किंवा आपल्याच राज्यात प्रवास करायचा झाल्यास संबंधित व्यक्तीने जवळच्या खाजगी डॉक्टरांकडून आपण फिट असल्याचे प्रमाणपत्र घ्यावे आणि प्रवासात ज्या ठिकाणी पोलीस कागदपत्रांची मागणी करतील तेव्हा ते प्रमाणपत्र आणि जिथे जाणार आहेत त्या पत्त्यावरील आधारकार्ड किंवा अन्य शासकीय ओळखपत्र दाखवून प्रवास करता येईल.

वैद्यकीय प्रमाणपत्रावर पोलिसांचा सहीशिक्का-

आपल्या राज्यातून परराज्यात किंवा आपल्याच राज्यातील एखाद्या ठिकाणी प्रवास करायचा झाल्यास संबंधित व्यक्तीने जवळच्या खाजगी डॉक्टरांकडून फिटनेस सर्टिफिकेट घेऊन आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशनला जाऊन त्या प्रमाणपत्रावर पोलिसांचा सही शिक्का घेऊन प्रवासात पोलीस ज्या ठिकाणी कागदपत्रांची मागणी करतील त्यावेळी सदरचे कागदपत्र आणि आपले आधारकार्ड किंवा शासकीय ओळखपत्र दाखवून प्रवास करता येईल.अशाप्रकारे लिहून निवेदन अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी  नगरविकास मंत्र्याना  दिले आहे. याबाबत प्रशासन यांच्या निवेदनाचा नक्की विचार करेल असा विश्वास त्यानी व्यक्त केला .

संबंधित पोस्ट