
खाजगी डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप
- by Rameshwar Gawai
- May 05, 2020
- 1161 views
बदलापूर :बदलापूरतील १५० खाजगी डॉक्टरांना भाजपाच्या वतीने पीपीई किटचे वाटप करण्यात आले. खासदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून हे पीपीई किट उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे पाणीपुरवठा समिती सभापती व भाजपाचे माजी शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सुरक्षेचीही काळजी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रशासनाने शहरातील सर्व खाजगी डॉक्टरांना तातडीने पीपीई किट उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र नगर परिषद प्रशासनाकडून या मागणीची दखल घेण्यात आली नाही.त्यामुळे भाजपाच्या वतीने ही किट्स उपलब्ध करून देण्यात आली असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम