साताऱ्यात आणखी दोन कैद्यानां कोरोना

● फलटणमधील कोरोनामुक्ताच्या संपर्काने मुलाला बाधा

● जिल्हा ७७, 

● ‘देवा, कराडची साखळी थांबू दे रे..... कराडकरांच्या तोंडचे बोल

सातारा(अनिल करंदकर) गेल्या आठवडय़ापासून प्रत्येक तासातासाला खळबळ उडणाऱया सलगच्या परिस्थितीत रविवार थोडा हुश्श करणारा होता..... आता हे हुश्श करणेही लोकांना भितीदायक वाटत आहे. प्रचंड प्रमाणांत घाबरलेल्या मनांत अंधश्रद्धाही पट्टकन शिरकाव करतात, तसंच ते आहे. रविवारी सातारा कारागृहात शिरलेल्या कोरोनाने आणखी दोन कैद्यांना चपेटमध्ये घेतले तर फलटणच्य तरडगावच्या महिला डॉक्टर कोरोनामुक्त झाल्या मात्र त्यापुर्वी त्यांच्या संपर्कात आल्याने ६ वर्षांच्या मुलाचा अहवाल पॉझेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रविवारी कराड तालुक्यात कोणाचाही अहवाल पॉझेटिव्ह आला नसल्याचे समजताच ‘देवा, कराडची साखळी थांबू दे रे..... ’ असे भाव कराडकरांच्या तोंडून आपसूकपणे बाहेर आलेत.

कोरोनाची दहशत कायम होती व आहे मात्र आकडय़ांच्या बेरजेत फार काही बदल झाले नाहीत. गेल्या तीन दिवसांत सुमारे दुप्पटीची उसळी घेणाऱ्या बाधितांच्या आकडय़ाला तशी मर्यादा राहिली. त्यामुळे जिल्हय़ाचा आकडा ७७ वर पोहोचला असून यातील ९ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. विलगीकरणांत घेण्याच्या तसेच बाधितांची हिस्ट्री तपासून संबंधितांच्या याद्या करण्याचे काम सातारा शहरासह फलटण व कोरेगाव येथे वेगात सुरू होते.

पुण्याहून आलेल्या अन्य दोन कैद्यांना बाधा

सातारा शहरांत तीन जण कोरोनाबाधित सापडल्यानंतर साऱया शहरांत दहशत निर्माण झाली असतानाच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱया कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला. शनिवारी दोन कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले असताना आतील कैद्यांना त्यातल्या त्यात विलगीकरणांत ठेवण्याच्या हलचाली झाल्या आहेत.

पुण्याच्या कारागृहांत प्रमाणापेक्षा अधिक कैदी होते तिथला भार कमी करण्यासाठी पुण्याहून परिसरांतील जिल्हय़ात कैदी हलवण्यात आले. त्यातले ४८कैदी साताऱयात आले आहेत. पुणे ते सातारा प्रवासादरम्यान यांच्यातल्या कोणाला तरी बाधा झाली व त्यानंतर त्याची लागण सुरू झाल्याचे बोलले जात आहे. शनिवारी २ जण पॉझेटिव्ह आल्यानंतर अन्य सर्वांचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले होते त्यातील ३१ व ५८ वर्षीय दोघांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा रूग्णालयांत उपचार सुरू झाले आहेत.

फलटणांतील मुलाला कोरोनाची बाधा

पुण्यात एका कॉन्फरंन्सला गेल्यामुळे कोरोनाची बाधा झालेली तरडगाव येथील महिला डॉक्टर शनिवारी कोरोनामुक्त झाल्या पण त्याच दिवशी त्यांच्या आईंचा अहवाल पॉझेटिव्ह आला होता. रविवारी त्यांच्याच घरांतील एका ६ वर्षीय मुलाचा अहवाल पॉझेटिव्ह आला. त्यामुळे लागण झाल्यानंतर १४ दिवसांत कोरोनाची साखळी तुटतेच असे नसल्याचे फलटणांतही स्पष्ट होत आहे.

५६ अहवाल निगेटिव्ह तर ५८ विलगीकरणांत

गेल्या आठवडय़ात बाधित रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढल्यामुळे विलगीकरणांत असलेल्यांची संख्याही मोठी होत होती. रविवारी साताऱ्यातील ४०, कोरेगावातील १६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेत. तर जिल्हय़ात एकुण ५८ जणांना विलगीकरणांत ठेवले आहे. साताऱयातील ३ आरोग्यकर्मी, कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेले १४ जण तर अन्य कारणांसाठी ३ असे २९ जणांना विलगीकरणांत ठेवले गेले. यांत शासनाने गरोदर मातांची तपासणी आवश्यक केल्याने साताऱयात ६ गरोदर महिलांना विलगीकरणांत ठेवले आहे.कराड उपजिल्हा रूग्णालयांत ७ आरोग्यकर्मी, कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले १६, अन्य आजारासाठी १ व गरोदर माता १ असे २५ जणांना विलगीकरणांत ठेवले आहे.

कराड तालुक्याचा आकडा वाढला नसल्याने किमान सुस्कारा तरी सोडला

पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्हा रेड झोनमध्ये जाणार हे शासनाने अधिकृत झोन जाहिर करण्याच्या आधिपासूनच बोलले जात होते. तर कराड हा साताऱयाचा हॉटस्पॉट बनलाय याची वंदताही सुरूवातीपासूनच सुरू झाली होती. जिल्हय़ाचा आकडा ७४ वर असताना एकटय़ा कराड मध्ये ५८ कोरोनाबाधित आहेत. मलकापुरांत १३ तर वनवासमाचीत २७ जण बाधित असल्याने रोज सकाळी व रात्री अहवाल आल्यानंतर कराडकरांच्या उरांत धडकीच भरत होती. जिल्हय़ात ४ जण बाधित असल्याचे समोर आले त्यात २ कैदी तर फलटणच्या मुलाचा समावेश होता. सकाळी व रात्रीच्या अहवालांत कराडचे कोणीच बाधित नाही, हे ऐकतांच कराडकरांच्या चेहऱयावर समाधानाची एकतरी रेषा उमटली.... असा भास होता. ही साखळी आता तुटावीच म्हणून प्रत्येकजण प्रयत्नशिल आहे.

सातारा जिल्हय़ाचे आकडे

सातारा जिल्हा   ७७

कराड तालुका  ५८

कराड शहर  ०४

सातारा शहर ९५

वनवासमाची २७

मलकापुर १३

फलटण तालुका  ०३

कोरेगाव तालुका ०१

सातारा जिल्हय़ाचे आकडे

एकुण २१८९

सातारा  १६३७

कराड ५५२

बाधित ७७

अबाधित १६६२

कोरोनामुक्त ०९

बळी ०२

होम क्वॉरंटिनः २२५७

इंस्टीटय़ंशनल क्वॉरंटिनः  २६६

एकुण प्रवासीः  २२५७

आजवर डिस्चार्जः  १६७१














रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट