साताऱ्यात पत्रकार मारहाण*प्रकरणी संरक्षण कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील १ला गुन्हा दाखल
एनयुजे महाराष्ट्रची कठोर कारवाईची मागणी
- by Adarsh Maharashtra
- May 01, 2020
- 988 views
खटाव :सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील बुध येथील
पत्रकार प्रकाश राजे घाडगे यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना परिस्थितीत टाळेबंदीमध्ये बाहेर गावावरून कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता गावात प्रवेश केलेल्या व्यक्तीवर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध केली होती.त्या बातमीचा राग मनात धरून त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी पत्रकार प्रकाश राजे घाडगे यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली होती.
सदर गुन्हा घडलेल्या दिवशी पुसेगाव पोलीस ठाण्यात भा द वि कलम ४५२,३२३,५०४,५०६,३४ नुसार दाखल करण्यात आला होता. मात्र यामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याचं कलम लावण्यात आले नव्हते.ही बाब लक्षात आल्यानंतर एन यु जे एम चे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ
विनोद खाडे व सचिव प्रकाश राजे घाडगे यांनी राज्य अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या सूचनेवरून कोरेगावचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी बी बी महामुनी
यांचे बरोबर संपर्क साधला असता त्यांनी" संचारबंदी कायदा असल्याने मा न्यायालयाची परवानगी घेवून पत्रकार संरक्षण कायद्या ची अंमलबजावणी करू असे सांगितले....आणि तीन दिवसांतच पत्रकार संरक्षण कायद्यानुसार दोषींवर पत्रकार संरक्षण कायदा कलम ४
नुसार गुन्हा दाखल केला गेला असून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले"
सातारा जिल्ह्यातील हा पत्रकार संरक्षण कायद्यानुसार १ला गुन्हा दाखल झाला असून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि पत्रकारांना निर्डपणे काम करता यावे अशी मागणी सातारा जिल्हा
एनयुजेएम ने केली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम