कोपरखैरणे डी मार्टला नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचा दणका ! डी मार्ट केले बंद

नवीमुंबई,(सुनील गायकवाड) देशभरात महाराष्ट्रात  व इतर राज्यात कोरोना च्या महामारी आजाराने संपूर्ण देशभरात  लॉक डाऊन परिस्थिती असल्याने संपूर्ण नागरिक हैराण झालेले आहेत या काळात अत्यावश्यक सेवा म्हणून डी मार्ट भाजीपाला दूध व्यवसाय आरोग्य विभाग सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासन व शासनाने दिलेल्या आहेत  

दरम्यान शासनाने आदेश दिले असतानाच डी-मार्ट चालकांनी ग्राहकांना रांगेत उभे राहून शिस्त लावली पाहिजे व सामाजिक अंतर ठेवून ग्राहकांना हव्या त्या वस्तू दिल्या पाहिजे असे आदेश व सूचना शासन व प्रशासनाच्या आहेत मात्र या सूचनेचे अंमलबजावणी कोपरखैरणे डी मार्ट शासन काटेकोरपणे करत नसल्याच्या तक्रारी नवी मुंबई महानगरपालिकेकडे येत होत्या

 त्या अनुषंगाने पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी गंभीर दखल घेऊन आज डी मार्ट ला टाळे ठोकण्याचे आदेश दिले होते

महागड्या दराने वस्तू विकण्याच्या नफा खोरी धंदा या डी मार्ट मध्ये लॉक डाऊन च्या काळात जोरदारपणे सुरू होता याची गंभीर दखल घेत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दणका या डी-मार्ट ला दिलेला आहे. आज दुपारी सुमारे साडेबाराच्या दरम्यान डीमार्ट बंद करून लोकांना माघारी पाठवून डी मार्ट बंद करण्यात आलेले आहे 

बऱ्याच दिवसापासून या डी मार्ट च्या अनेक तक्रारी येत होत्या मात्र त्या तक्रारीकडे संबंधित महानगरपालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत होते मात्र आज दस्तरखुद्द महानगर पालिका आयुक्तांनी डी मार्ट वर कायद्याचा बडगा उगारून डी मार्ट बंद करण्याचे थेट आदेश  सहाय्यक आयुक्त अशोक मडवी यांना दिले होते मढवी यांनी पोलिसांच्या मदतीने गुरुवारी साडेबाराच्या दरम्यान डी मार्टला  टाळे ठोकुन कारवाई केलेली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट