महापालिकेची निवडणुक अनिश्चित काळासाठी पुढें ढकलण्याचा राज्य निवडणुक आयोगाचा निर्णय

निवडणुक पुढें गेल्याने, भाजपला बसणार मोठा धक्का

नवी मुंबई(प्रतिनिधी): सद्या देशासह राज्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नवी मुंबई महापालिकेसह राज्यातील महापालिका , जिल्हापरिषदच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणुक आयोगाने घेतला आहे. निवडणुकीसाठी आतापर्यंत झालेले निवडणुकीसाठीचे कामकाज थांबविण्याचे आदेश राज्य निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी पालिकेच्या आयुक्तांना मंगळवारी दिले. दरम्यान,निवडणुक लांबणीवर गेल्याने त्याचा भाजपला मोठा धोका निर्माण होणार असल्याचे दिसून येते.

   नवी मुंबई महापालिकेसह औरंगाबाद महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. नवी मुंबई महापालिकेच्या चौथ्या सभागृहाची मुदत येत्या ९ मे रोजी संपुष्टात येत आहे. नव्याने पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना,प्रभाग आरक्षण,मतदार यादी अद्यावत करणे अशा कामांना सुरुवात करण्यात आली होती. राज्यातील तत्कालीन युती सरकारने नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक बहुसद्स्य पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यादृष्टीने प्रभाग रचना करण्यात आली होती. राज्यात महाविकासाघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकासाघाडीतील घटक पक्षाच्या मागणीनुसार पुन्हा एक सदस्य पध्दतीने पालिकेची निवडणुक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाआहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार पुन्हा पुर्वीच्या एक प्रभाग रचना कायम करण्यात आली. तसेच, प्रभाग आरक्षण देखिल पार पाडली. सद्या मतदार यादी दुरुस्ती व हरकती सुचना घेण्याचे काम सुरू असताना, राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनावर शासन स्थरावर विविध उपाययोजना सुरू असल्याने, कर्मचाऱ्यांवर येणारा ताण लक्षात घेता नवी मुंबईसह अन्य पालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. त्यानुसार,राज्य सरकारने निवडणुक आयोगाला केलेल्या विनंतीनुसार निवडणुक आयोगाने नवी मुंबईसह पालिकेच्याअन्य निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढें ढकलण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भात महापालिकांना कळविले आहे. दरम्यान, महापालिकेची निवडणुक पुढें गेल्याने, स्थानिक भाजप मध्ये सुरु असलेली गळती थांबेल परंतु निवडणुक लाबणीचा फटका भाजपला बसेल असे दिसुन येते.
Attachments area


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट