महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची निवडणूक बिनविरोध

संजीवराजे नाईक–निंबाळकर -अध्यक्ष

पुणे : २०२० ते २०२४  विविध पदांकरिता करिता कोणाचेही ज्यादा अर्ज न आल्याने ही निवडणूक आज बिनविरोध पार पडली. फडके सभागृह,सदाशिवपेठ, पुणे येथे पार पाडलेल्या  निवडणुकीत खालीलउमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत असे निवडणूक अधिकारी निवृत्त जिल्हा न्यायाधीशदिलीप कृष्णा गायकवाड यांनी जाहीर केले. यानिवडणुकीत भारतीय खो खो महासंघाचे निरीक्षक म्हणून इंदोरचे नितिन कोठारी उपस्थित होते.   अध्यक्ष - संजीवराजे नाईक - निंबाळकर (सातारा)उपाध्यक्ष (४ जागा): १. मा. ना. डॉ. जितेंद्र आव्हाड (ठाणे), २. महेश गादेकर (सोलापूर), ३. अशोक पितळे (अहमदनगर), ४. विजयराव मोरे (रायगड) कार्याध्यक्ष - सचिन गोडबोले (पुणे) सरचिटणीस - गोविंद शर्मा (औरंगाबाद)संयुक्त चिटणीस (५ जागा):  १. राजेश सोनवणे (नंदुरबार), २. डॉ. पवन पाटील (परभणी), ३. जयांशू पोळ (जळगाव), ४. डॉ. प्रशांत इनामदार (सांगली), ५. गंधाली पालांडे (ठाणे)खजिनदार -  ॲड. अरुण देशमुख (मुंबई)निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन माननीय संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले, तर चंद्रजीत जाधव यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट