माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे निधन

फलटण:-माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे वडील माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर (वय ७२) यांचे आज रविवार पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 
माढा मतदारसंघातील विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर यांचे ते वडील होते. जिल्हा परिषदेच्या सदस्या जिजामाला नाईक निंबाळकर त्यांच्या स्नुषा आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी खासदार राहिलेल्या हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचा राजकीय प्रवास हा संघर्षमय राहिला आहे.त्यांच्या दुःखद निधनामुळे हा प्रवास थांबला आहे. माजी खासदार नाईक निंबाळकरांचा सातारा जिल्ह्यातील शेनवडी गावात त्यांचा १५ ऑगस्ट १९४८ रोजी जन्म झाला. पुढे दहावीपर्यंत शिक्षण घेता आले, त्यांनी १९९५ मध्ये फलटण नगरपरिषदेवर उपनगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली, यानंतर त्यांनी लोकसभेच्या निवडणुका लढवल्या, मात्र त्यांना यात काही वेळा अपयश आले. तिसऱ्या वेळी शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी घेतलेले हिंदुराव नाईक निंबाळकर तिरंगी लढतींमध्ये विजयी झाले. सातारा लोकसभा मतदारसंघातून अकराव्या लोकसभेसाठी खासदार म्हणून त्यांनी शपथ घेतली, त्यांनी फलटण, माळशिरस, माण या भागातील दुष्काळी गावांसाठी धोम बलकवडी, नीरा देवधर टेंभू या योजनांसाठी कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा उचलला.
लोणंद पंढरपूर नीरा देवधर प्रकल्प यासाठी अनेक वेळा मोर्चे सभा गाव भेट दौऱ्याचे त्यांनी नेतृत्व केले. नीरा देवधर पाणी हक्क समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर व माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी माळशिरस तालुक्यातही त्यांनी नीरा देवधर प्रकल्पातील गावांचा दौरा केला होता. सध्या त्यांचा मुलगा रणजित नाईक निंबाळकर माढा मतदारसंघातून लोकसभेेचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट