कर्जत तालुक्यात ठिकठिकाणी भगव्यामय वातावरणात शिवजंयती उत्साहात साजरी; शिवप्रेमी प्रंचड उत्साही!
- by Sanjay Pachouriya
- Mar 12, 2020
- 604 views
कर्जत :रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांत ठिकठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजंयती उत्सव मोठ्या थाटामाटात भगवामय वातावरणात थाटामाटात साजरा झाला आहे. यावेळी विविध शासकीय कार्यालय आणि कर्जत तालुक्यांतील विविध शिवसेना शाखेच्या वतीने छ्त्रपतीं शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आहे.
कर्जत तालुक्यांसह नेरळ, कडाव, भिवपुरी, कशेळे, आसल व अन्य परीसरात शिवभक्तांनी मोठ्या उत्साहात आज शिवजंयती उत्सव साजरा केला आहे. तसेच नेरळ ग्रामपंचायत कार्यालयासह नेरळ शिवसेना शाखेतही शिवजंयती उत्सव साजरा करण्यात आला आहे. नेरळ राजेंद्र गुरु नगरातही मोठ्या थाटामाटात हा शिवजंयती उत्सव राजेंद्र गुरु नगर रहीवाशी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला आहे.
आज शिवजयंती निमित्त सकाळीच नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात नेरळचे सरपंच रावजी शिंगवा यांच्या हस्ते छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवप्रतिमेचे पूजन करुन महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणेत आला आहे. त्यानंतर नेरळ शहरातील छत्रपती शिवाजी चौकात जावुन नेरळ ग्राम पंचायतीचे वतीने नेरळ ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार धर्मानंद गायकवाड आणि ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे यांनी महाराजांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले आहे. यावेळी येथे नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच रावजी शिंगवा, उपसंरपंच शंकर घोंडविंदे, सदस्य जयश्री मानकामे, ग्रामपंचायत सदस्या उमाताई खडे, गीतांजली देशमुख, शिवाली पोतदार, पार्वती पवार, अतुल चंचे, संतोष शिंगाडे, राजन लोभी, सौ. चंचे व यासंह नेरळ ग्रामपंचायतीचे अनेक कर्मचारी येथे उपस्थितीत होते.
दरम्यान आज कर्जत तालुक्यांतील विविघ भागांत शिवजंयती उत्सवाचे मोठ्या थाटामाटात आयोजन करण्यात आले होते. संपुर्ण तालुक्यांसह नेरळ शहरात शिवजंयती उत्सव समितीचा वतीनेही भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन नेरळ शहरात करण्यात आले होते. नेरळ शिवंजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दर्शन मोडक यांनी व त्यांचा सहकार्यानी यासाठी मेहनत घेतली होती. यावेळी तालुक्यातील अनेक ठिकाणी जयघोष करीत शिवभक्तांनी मोठ्या थाटात ठिकठिकाणी शिवजंयती उत्सव साजरा केल्याचे पाहावायस मिळाले आहे.
रिपोर्टर
Reporter
आदर्श महाराष्ट्र वेब टीम