
युवा नेते अक्षय पोपटराव देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- by Sanjay Pachouriya
- Mar 09, 2020
- 1594 views
नवी मुंबई (प्रतिनिधी) : ऐरोली प्रभाग क्र.१५ मधील समाजसेवक व युवा नेते अक्षय पोपटराव देशमुख यांचा वाढदिवस नुकताच कै.आमदार अण्णासाहेब पाटील उद्यान, ऐरोली,सेक्टर नं.१६ येथे साजरा करण्यात आला. अक्षय देशमुख हे माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संयुक्त सरचिटणीस व जनसंपर्क अधिकारी श्री.पोपटराव देशमुख यांचे सुपुत्र आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे माजी मंत्री व माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे,नवीमुंबई शिवसेना नेते विजयजी चौगुले आदी मान्यवरांसह शेकडो युवक व रहिवाशी उपस्थित होते. विशेष म्हणजे अक्षय देशमुख यांनी आपला वाढदिवस परिसरातील झोपडपट्टी भागातील सर्वसामान्य मुलांसोबत साजरा करुन आपल्या सामाजिक कार्याचा वेगळा ठसा दाखवून दिला आहे.
अक्षय देशमुख हे बालपणापासून ऐरोली येथे रहात असून,त्यांचा स्वभाव मूळात विनयशील असल्याने या परिसरातील रहिवाश्यांमध्ये त्यांच्याबद्दल एक वेगळाच आदर निर्माण झालेला आहे. युवा वर्गानेही त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे. अक्षय देशमुख हे समाजातील तरुण वर्गांचे लोकप्रिय व्यक्तीमत्व असून,या नेतृत्वाला सामाजिक कार्याची संधी मिळवून देण्यास आंम्ही पुढाकार घेऊ आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू,असा विश्वास शशिकांत शिंदे व विजयजी चौगुले यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केला.
नवीमुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक १५ हा सर्वसाधारण मतदार संघ असून,या मतदार संघात श्री.पोपटराव देशमुख हे गेली ३० वर्षे सामाजिक व धार्मिक कार्य चांगल्या प्रकारे करीत आहेत. तसेच ते माथाडी कामगार संघटनेत प्रशासकिय सेवेत काम करीत आहेत. त्यांची माथाडी कामगार ते सर्व माथाडी कामगार नेत्यांमध्ये सुपरिचित असून,मंत्रालय व शासकिय कार्यालयातील कामकाजाची त्यांना चांगली जाण असल्याने त्यांच्यामध्ये स्थानिक नागरिकांची कामे करुन घेण्याची हातोटी आहे. नवीमुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक १५ मधून श्री.पोपटराव देशमुख अथवा अक्षय देशमुख यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुक लढविण्याची संधी मिळाल्यास त्यांचा विजय निश्चित होऊ शकतो अशी चर्चा सध्या या प्रभागातील नागरिकांमध्ये सुरु आहे.
रिपोर्टर
Reporter
आदर्श महाराष्ट्र वेब टीम