बाजारात हापूस अवतरला! एक पेटी १० हजाराला

वाशीतील घाऊक फळ बाजारात गुरुवारी कोकणातील हापूस आंब्याचे आगमन झाले. त्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारातील माजी संचालक संजय पानसरे यांच्याकडे हापूस आंब्याच्या पाच डझनाच्या पाच पेट्या दाखल झाल्या आहेत. आंब्याच्या पाच डझनांच्या एका पेटीला तब्बल दहा हजारांचा दर मिळाला आहे.

नवी मुंबई(प्रतिनिधी) :वाशीतील घाऊक फळ बाजारात गुरुवारी कोकणातील हापूस आंब्याचे आगमन झाले. त्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारातील माजी संचालक संजय पानसरे यांच्याकडे हापूस आंब्याच्या पाच डझनाच्या पाच पेट्या दाखल झाल्या आहेत. आंब्याच्या पाच डझनांच्या एका पेटीला तब्बल दहा हजारांचा दर मिळाला आहे.

यावर्षी सर्वच ठिकाणच्या आंब्याचा हंगाम दोन महिन्यांनी लांबला आहे. त्यामुळे सर्वांनाच हापूसची प्रतीक्षा होती. दरवर्षी डिसेंबरमध्ये होणारी हापूस आंब्याची दोन ते चार पेट्यांची आवक यावेळी उशिरा सुरू झाली.

यावर्षी लांबलेल्या पावसामुळे ऑक्टोबरमध्ये येणारा आंब्याचा मोहोर आलाच नाही. त्यानंतर आवश्यक ती थंडी पडली नाही. त्यामुळे आंब्याला मोहोर धरला नाही. दिवाळीनंतरही पाऊस थांबल्यावर डिसेंबरच्या सुरुवातीला धरलेला मोहोर काही शेतकऱ्यांनी टिकवून ठेवला. त्यातून लागलेले आंबे आत्ता बाजारात आले आहेत.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट